शिवीगाळ करून युवकाच्या दिशेने दगड फेकणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

0
49

नेता सुभाष चौकातील लोढा हाईटसमोरील प्रार्थनास्थळाकडे जात असताना एकास शिवीगाळ करून त्याच्या दिशेने दगड फेकल्याची घटना बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमीर हमीद तांबोळी (वय ३५, रा. एम. जी. रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा अनोळखींविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांबोळी हे सुन्हेरी मस्जिद येथे बाथरुम करीता गेले होते. त्यावेळी लोढा हाईटच्या टेरेसवरुन एकाने त्यांना शिव्या दिल्या. तसेच दरवाजावर दगड लागल्याचा आवाज आला. त्यांनी खाली येऊन पाहिले असता लोढा हाईटवर दोघे अज्ञात व्यक्ती दिसले, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.