आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पोलिस अधिकार्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्यानंतर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक एकूण ४३ अधिकार्यांच्या बदल्या जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केल्या आहेत. नगर जिल्ह्यात नव्यानेहजर झालेले अधिकारी पो.नि. राजेंद्र इंगळे (वाहतूक नियंत्रण शाखा, शिर्डी), पो.नि. खगेन्द्र टेभेंकर (शनिशिंगणापूर पोलिस ठाणे), पो.नि. सोपान काकड (राहाता पोलिस ठाणे), पो.नि. सतिश घोटेकर (शिर्डी साई मंदिर सुरक्षा, अति.कार्यभार बीडीडीएस), स.पो.नि. प्रल्हाद गिते (नगर तालुका पोलिस ठाणे), स.पो.नि. प्रकाश पाटील (मिरजगाव पोलिस ठाणे), स.पो.नि.पप्पू कादरी (शिर्डी पोलिस ठाणे) अशी आहेत. पोलिस अधिकार्यांच्या बदल्या याप्रमाणे स.पो.नि. सोमनाथ दिवटे (आर्थिक गुन्हे शाखा), स.पो. नि. राजु लोखंडे (जिल्हा विशेष शाखा), स.पो.नि. मोहन येसेकर (वाहतूक नियंत्रण शाखा, शिर्डी शहर), स.पो.नि. रविंद्र पिंगळे (राहुरी पोलिस ठाणे), स.पो.नि. विश्वास भान्सी (संगमनेर शहर पोलिस ठाणे), स.पो.नि. नितीन रणदिवे (पाथर्डी पोलिस ठाणे), स.पो.नि. विश्वास पावरा (कोपरगाव शहर पोलीस ठाणे), स.पो.नि. प्रमोद वाघ (नेवासा पोलिस ठाणे), स.पो.नि. रामेश्वर कायंदे (शिर्डी पोलिस ठाणे), स.पो.नि. महेश जानकर (कोतवाली पोलिस ठाणे), स.पो.नि. प्रशांत कंडारे (शेवगाव पोलिस ठाणे), स.पो.नि. संभाजी पाटील (पारनेर पोलिस ठाणे), स.पो.नि. योगिता कोकाटे (कोतवाली पोलिस ठाणे), स.पो.नि. प्रविण दातरे (तोफखाना पोलीस ठाणे), स.पो.नि. कल्पेश दाभाडे (अहमदनगर नियंत्रण कक्ष), स.पो.नि. रामचंद्र कर्पे (अहमदनगर शहर वाहतूक शाखा), स.पो.नि. विजय झंजाड (खर्डा पोलिस ठाणे), स.पो.नि. विजय माळी (कर्जत पोलिस ठाणे), पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे ( बीडीडीएस, अहमदनगर), अश्विनी मोरे (भरोसा सेल, अहमदनगर), युवराज चव्हाण (जिल्हा विशेष शाखा), योगेश चाहेर (शहर वाहतूक शाखा, अहमदनगर), श्रीकांत डांगे (दहशतवाद विरोधी शाखा, अहमदनगर), शेलेंद्र जावळे (नियंत्रण कक्ष, अहमदनगर), अनिल भारती (शिर्डी वाहतूक नियंत्रण शाखा), पोपट कटारे (नियंत्रण कक्ष अहमदनगर), मनोज महाजन (कोपरगाव पोलिस ठाणे), तुळशीराम पवार (नियंत्रण कक्ष अहमदनगर), अतुल बोरसे (भिंगार पोलिस ठाणे), भरत दाते (पारनेर पोलिस ठाणे), समाधान भाटेवाला (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर), संतोष पगारे (जामखेड पोलिस ठाणे), निकिता महाले (एमआयडीसी पोलिस ठाणे), मनोज मोंढे (एमआयडीसी पोलिस ठाणे), निवांत जाधव (नक्षल शाखा, अहमदनगर), उमेश पंतगे (नियंत्रण कक्ष अहमदनगर). तर पो.नि. अशोक भवड यांची शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात केलेली बदली रद्द करण्यात आली आहे.