मुदतपूर्व जन्मलेल्या २७ आठवड्याच्या बाळावर आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

0
24

नगर – गरोदरपणात वेळेआधी डिलिव्हरी करायची वेळ आल्यास आई व नवजात शिशुच्या प्रकृतीबाबत गंभीर समस्या उद२भवतात. नगरमधील सरस्वती हॉस्पिटल येथे एका महिलेची गरोदरपणाच्या २७ व्या आठवड्यातच डिलिव्हरी करावी लागली. नवजात शिशुचे वजन अतिशय कमी फे एक किलो होते. त्याला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. त्यामुळे बाळाला तातडीने आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील अद्ययावत एनआयसीयु येथे दाखल करण्यात आले. बालरोग तज्ज्ञ डॉ.श्रेयस सुरपुरे आणि त्यांच्या टिमने या बाळावर योग्य उपचार केले. त्यामुळे काही दिवसातच बाळ पूर्ण बरे झाले व त्याला आईसह घरी सोडण्यात आले. हॉस्पिटलमधील प्रभावी उपचारांमुळे बाळाला नवीन जीवन मिळाले अशी भावना बाळाच्या पालकांनी व्ये केली. सरस्वती हॉस्पिटल येथे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अमोल जाधव यांच्याकडे आलेल्या महिलेस बी.पी.चा त्रास होता. त्यावर योग्य उपचार चालू होते. परंतु तिला मुदतपूर्व प्रसव वेदना सुरु झाल्या. त्यामुळे बाळ लवकर जन्माला आले. ते केवळ २७ आठवड्यांचे होते. वजन एक किलो होते आणि श्वास घेण्यासही त्रास होत होता. नाजूक परिस्थितीत बाळाला आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील एनआयसीयुमध्ये उपचारांसाठी दाखल कण्यात आले. बाळाला ८ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्याची तब्येत खूप सिरियस होती.

डॉ. श्रेयस सुरपुरे यांनी योग्य उपचार सुरु केले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाल्याने बाळ व्यवस्थित बरे झाले. बाळाला घरी सोडण्यापूर्वी मेंदूची सोनोग्राफी, डोळ्यांची, कानाची तपासणी करण्यात आली. सर्व रिपोर्टस नॉर्मल आले. आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील अद्ययावत एनआयसीयु येथे नवजात बालकांवरील उपचारांसाठी आवश्यक सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. टू डी इको, मेंदूची सोनोग्राफी (एनएसजी), डोळे, कानाची तपासणी, थायरॉईड तपासणी मुदतपूर्व जन्मलेल्या बाळासाठी खूप महत्वाच्या असतात. या सर्व तपासण्या करण्यात आल्या व सर्वच रिपोर्ट नॉर्मल आले. बाळाचे वजन चांगल्या प्रकार वाढले आहे. ते स्तनपानही करीत आहे. कोणताही त्रास नसल्याने बाळाला सुखरुपपणे त्याच्या पालकांकडे सुपुर्द करण्यात आले.