अहमदनगर जिल्ह्यात ३६ लाख ११ हजारांवर मतदार

0
57

 

६८ हजार ९४० ची वाढ तर ४० हजार वगळले; १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

नगर – यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्या मतदार यादयांच्या अद्यावतीकरणसाठी अहमदनगर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा ट क्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन…रिक्षण कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यामध्ये २७ ऑटोबर ते ९ डिसेंबर २३ या कालावधीत यशस्वीपणे राबविणेत आला असून, २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदारयादी अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रसिध्द करणेत आली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन…रिक्षण कार्यक्रम राबवितांना महिला, नवयुवक, भटया विमुे जाती, तृतीय पंथीय, दिव्यांग आणि समाजातील वंचित घटकांची मतदार नोंदणी करणेबाबत विशेष लक्ष पुरविणेत आले होते. याकरीता १७/१०/२०२३ आणि ३०/१०/२०२३ या कालावधीत विशेष ग्रामसभांचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यामध्ये करणेत आले होते व सदर ग्रामसभांमध्ये मतदार नोंदणी विशेष मोहिमेबाबत बाबत नागरीकांमध्ये प्रसिध्दी व जनजागृती करणेत आली. तसेच जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमांचे आयोजन ४/११/२०२३, ५/११/२०२३, २५/११/२०२३ व २६/११/२०२३ रोजी करणेत आले होते.

सदर विशेष मोहिमांमध्ये देखील नागरीकांनी उत्तम प्रतिसाद दिला. नवयुवकांकरीता १/८/२०२३ ते ८/८/२०२३ या कालावधीत जिल्ह्यातील एकूण १२० महाविद्यालयांमध्ये नवयुवक मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करणेत आले होते. या शिबिरांमध्ये जिल्ह्यामध्ये नवयुवकांची मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी करणेत आली. २३/१/२०२४ रोजी प्रसिध्द अंतिम मतदार यादीतील मतदार संख्येचा तपशिल सोबतच्या चौकटीप्रमाणे. जिल्ह्यामध्ये मागील काही विशेष पुन…रिक्षण कार्यक्रमांमध्ये झालेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांची सध्या पार पडलेल्या पुन…रिक्षण कार्यक्रमाशी तुलना करता सन २०२३ मध्ये पार पडलेल्या पुन…रिक्षण कार्यक्रमामध्ये एकूण २५९७६ मतदारांची नोंदणी झाली होती. सध्या पार पडलेल्या १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुन…रिक्षण कार्यक्रमामध्ये एकूण ६८९४० मतदार नोंदणी झाली आहे तसेच ४००३० मतदारांची वगळणी करण्यात आली असून १९३८९ मतदारांच्या मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती करण्यात येऊन मतदार यादीचे शुध्दीकरण करण्यात आलेले आहे. मागील पुन…रिक्षण कार्यक्रमांमध्ये असलेले स्त्री पुरुष प्रमाण ९२२ मध्ये वाढ होऊन सध्या स्त्री पुरुष प्रमाण ९२७ या पुन…रिक्षण कार्यक्रमांतर्गत झालेले आहे. सदर पुन…रिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये २/७/२०२३ ते २१/८/२०२३ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या घरोघरी भेटीची मोहिम देखील पार पडली असून, त्यामध्ये ८० वषारवरील मतदारांची पडताळणी, समान छायाचित्र व समान स्थान असलेल्या मतदारांच्या नोंदींची पडताळणी करुन एकूण ६९१९३ इतया मतदारांची वगळणी केलेली आहे. सदर मोहिमेंतर्गत मतदारयादीचे शुध्दीकरण करणेसाठी व मतदारयादी अधिकाधिक अचूक कशी होईल याबाबत जिल्ह्याम ध्ये पुरेपूर काळजी घेतली आहे.

सदर वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणी-अंती कायदेशीररीत्या करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व पात्र नागरीकांनी आपले नांव मतदार यादीमध्ये आहे किंवा कसे ? याबाबत दक्ष राहणे आवश्यक असून त्याकरीता मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेत स्थळावर https://
voters.eci.gov.in ^oQ> Úmdr VgoM (https://electoralsearch.eci.gov.in/) या संकेत स्थळावर भेट देऊन आपले नांव मतदारयादीमध्ये असलेबाबत खात्री करुन घ्यावी. २३ जानेवारी २०२४ रोजी पासून मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरु राहणार असून, ज्या पात्र नागरीकांचे नांव अद्यापही मतदारयादीमध्ये नोंदविलेले नाही किंवा तपशिलामध्ये दुरुस्ती करावयाची आहे अशा नागरीकांनी उे नमूद संकेतस्थळांना भेट देऊन आपले नांव मतदार यादीत नोंदवावे. तसेच तकअ रिि व्दारे नागरीक आपले नांव व मतदान केंद्राबाबतची माहिती पाहू शकतात. सदर अ‍ॅपचा देखील नागरीकांनी जास्तीतजास्त वापर करावा. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. सर्व राजकीय पक्षांनीही आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या नियुत्या करून त्याच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे. नागरिकांना मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच ’मतदाता सेवा पोर्टल’ आणि ’वोटर हेल्पलाइन अ‍ॅप’ यांवर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.