‘अंबिका महिला मंडळा’च्यावतीने श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा सोहळा उत्साहात

0
23

नगर – माळीवाडा, पारगल्ली येथील अंबिका महिला मंडळाच्यावतीने आयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी हिराबाई सुडके, विणा गाडिलकर, राणी आंबेकर, सरस्वती आंबेकर, स्वाती साठे, आरती चंगेडिया, शशिकला पुंड, आशा इवळे, सुनिता घुले, शिला औटी, सुवर्णा पाटील, नम्रता गायकवाड, प्रिती गाडळकर, प्रतिक्षा पठारे, अर्चना सुडके, पुनम जाधव, स्वाती शिंदे, अर्चना राऊत, मिना सांगळे, रेश्मा पठारे, अंजली खरपुडे आदि महिला उपस्थित होत्या. यावेळी परिसरात भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या, प्रत्येक घराघरापुढे आकर्षक रांगोळी काढण्यात आली.

विद्युत रोषणाई, सायंकाळी दिपोत्सव साजरा करुन फटायांचे अतिषबाजी करण्यात आले. यावेळी राम, लक्ष्मण, सिता यांची वेशभुषा बालके सवारचे आकर्षण ठरले. यानंतर सवारना लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आले. प्रभु श्रीराम ज्यावेळी वनवास संपवून, लंका जिंकून पुन्हा आयोध्येत आले होते, त्यावेळी ज्याप्रमाणे सवारनी आनंदोत्सव साजरा केला होतो, तोच उत्साह आज सर्व देशभर आहे. हजारो वषारपूर्वी असलेली परिस्थिती आज पुन्हा अनुभवायला मिळत आहे. सुमारे ५०० वषारनंतर रामलल्ला त्यांच्या मंदिरात प्रवेश करत आहे. यासाठी फे आयोध्याच नाही तर पुर्ण देश सजला आहे. तोच उत्साहन आज माळीवाड्यात दिसून आला.