मेमरी कोच पंकजा बाफना यांनी विद्यार्थ्यांना दिला स्मरणशक्ती व एकाग्रता वाढविण्याचा मंत्र

0
58

अशोकभाऊ फिरोदिया इिं१२लश मिडियम स्कूलमध्ये विशेष कार्यशाळा

नगर – स्मरणशेी आणि एकाग्रता चांगली असल्यास अभ्यास चांगला होतो. विषय समजून घेण्यास मदत होते. या गोष्टी वाढविण्यासाठी छोट्या छोट्या लुप्त्यांचा अवलंब केला पाहिजे. त्यामुळे स्मरणशेी तीन पटीने वाढू शकते. तसेच एकाग्रता वाढण्यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. लहान वयातच या सवयी रूजल्यास आयुष्यात त्याचा फायदा होतो, असा मंत्र करियर कन्स्लटंट व मेमरी कोच पंकजा बाफना यांनी विद्याथ्यारना दिला. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल येथे संस्थेच्या कार्यवाही छायाताई फिरोदिया यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी व पालकांसाठी पंकजा बाफना यांच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, रेखा शर्मा, वैशाली वाघ, रुबिना शेख उपस्थित होते. रुबिना शेख यांनी बाफना यांचा परिचय करून देताना सांगितले, बाफना या मूळच्या नगरच्या असून मुंबईत करियर कन्स्लटंट व मेमरी कोच म्हणून कार्यरत आहेत. विद्याथ्यारना स्मरणशेी वाढवण्याच्या सोप्या सोप्या ट्रिक सांगत अभ्यासाचा आनंद कसा घ्यायचा याबाबत त्या प्रभावी मार्गदर्शन करतात. नैसर्गिक क्षमतेनुसार करियरसाठी कोणते क्षेत्र निवडावे, एकाग्रता कशी वाढवावी या विषयावरील त्या देशभरात विविध ठिकाणी कार्यशाळा घेतात. दुबई, सिंगापूर येथेही त्यांच्या कार्यशाळा झाल्या आहेत.

गत आठ वर्षात त्यांनी एक लाखाहून अधिक विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन केले असून पुढील दोन वर्षात दहा लाख विध्यार्थ्यांपर्यंत  पोहचण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्या एनएलपी प्रॅटिशनर असून आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त योगा टिचर आहेत. जागतिक मेमरी चॅम्पियनशिप २०२३ च्या विभागीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. भारताला प्रथमच मेमरी चॅम्पियनशिपचे यजमानपद मिळाले होते. पंकजा बाफना यांनी आपल्या कार्यशाळेत स्मरणशेी विषयी रूढ असलेले अनेक गैरसमज दूर केले. काही ट्रिक वापरुन आपण आपली स्मरणशेी तीन पट वाढवू शकतो. एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्यामुळे अभ्यास कंटाळवणा न राहता सोपा, वेगात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आनंददायी होतो. परीक्षे विषयी मनात असलेली भीती दूर होते. अशा अतिशय महत्वाच्या विषयांवर त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाला विद्यार्थी व पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शेवटी शिल्पा करमाळकर यांनी आभार मानले. कार्यशाळा व अधिक माहितीसाठी संपर्क – ९१६७४४११०९.