गुरुनानक देवजी ग्रुपचे रामभक्तांना १०८ किलो लापशी प्रसादाचे वाटप

0
57

तारकपूरला शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधवांचा आनंदोत्सव

नगर – अयोध्येत राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव सर्वत्र साजरा होत असताना शहरातील शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधवांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला. तारकपूर येथील गुरुनानक देवजी ग्रुपच्या (जी.एन.डी.) वतीने रामनामचा १०८ वेळा जाप करुन रामभेांना १०८ किलो लापशीचे वाटप करण्यात आले. सोमवारी सकाळ पासून लापशीचे वाटप सुरु होते. यावेळी जनक आहुजा, संजय आहुजा, सुरजीतसिंह गंभीर, महेश मध्यान, करन धुप्पड, करन आहुजा, अनिश आहुजा, बबलू खोसला, किशोर कंत्रोड, दिनेश कंत्रोड, विकी कंत्रोड आदींसह नागरिक उपस्थित होते. परिसरात भगवे झेंडे लावून आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

भाविकांनी प्रसादासाठी घेण्यासाठी गर्दी केली होती. जनक आहुजा म्हणाले की, भगवान रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर संपूर्ण देश राममय झाला असून, रामराज्य निर्माण होत असल्याची अनुभूती येत आहे. राम मंदिर सद२भावाचे प्रतीक म्हणून पुढे येणार असून, या सद२भावनेने देशाची वाटचाल राहणार आहे. सवारचे हात प्रार्थना व एकमेकांना आधार देण्यासाठी पुढे सरसावले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.