नगर अर्बन बँक कर्ज फसवणूक गुन्ह्याच्या तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना; पोलिस अधीक्षकांचा निर्णय

0
34

नगर – येथील नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकाचे प्रमुख म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे असणार असून यात तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर, दोन पोलीस निरीक्षक व पाच पोलीस अंमलदार यांचा समावेश असणार आहे. एसआयटी पथक स्थापन झाल्याने अर्बन बँक कर्ज फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासाला गती येणार आहे. बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याचा तपास सुरू आहे. बँकेच्या सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिटही झाले असून घोटाळ्याचा आकडा २९१कोटींवर गेलेला आहे.

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया व प्रदीप जगन्नाथ पाटील या दोघांना अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (दि.२२) संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. फसवणूक प्रकरणात संबंध असलेल्या सहा जणांना तपासकामी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने नोटीसा दिल्या होत्या. ते हजर न झाल्याने त्यांना पुन्हा नोटीसा काढण्यात आल्या होत्या. तरीही ते हजर न झाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेकडूनही नोटीस देणायारचा शोध सुरू आहे. दरम्यान या नोटीसा देण्यामध्ये फे बँकेचे अधिकारी असल्याची माहिती असून यामध्ये कोणत्याही संचालकाचा समावेश नसल्याचे समजते. अर्बनच्या तपासाला गती देण्यासाठी अधीक्षक ओला यांनी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे प्रमुख म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक खैरे यांची नियुेी केली आहे.