नगर – राज्यातील ११ सामाजिक संस्थांमधून सर्वाधिक मते घेऊन नगर येथील स्नेहबंध सोशल फौंडेशनने राज्यस्तरीय आयकॉन ऑफ सोशल वर्क सामाजिक संस्था २०२४ हा पुरस्कार पटकावला. नुकताच हा पुरस्कार स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी ममताताई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते स्वीकारला. नगर तालुयातील स्पर्श सेवाभावी संथेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन मागवले होते. त्यात सामाजिक संस्थेसाठी राज्यभरातील ११ सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यात स्नेहबंधने हा आयकॉन ऑफ सोशल वर्क सामाजिक संस्था पुरस्कार पटकावला. या पुरस्काराचे वितरण महाराष्ट ्र टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा शुभांगी पाटील, डॉ. सारिका बांगर, न्यास नोंदणी कार्यालयाच्या रुपाली गीते, स्पर्श संस्थेचे संस्थापक प्रविण साळवे, अध्यक्षा शितल साळवे, पोस्टल संघटनेचे संतोष यादव, बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंभे, माहेर संस्थेच्या सुप्रिया मंडलिक, विनय सपकाळ यांच्या उपस्थितीत झाले. मानपत्र, स्मृतिचिन्ह, पदक व मानाचा फेटा असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याप्रसंगी निशांत पानसरे, सुभाष पेंडुरकर, सचिन पेंडुरकर, अमोल बास्कर आदी उपस्थित होते.
पुरस्काराने बळ वाढवले
मतांद्वारे प्रथम मिळालेल्या या पुरस्कारामुळे समाजसेवा करण्यास बळ मिळाले आहे. स्नेहबंधच्या माध्यमातून गेल्या दहा वषारपासून सामाजिक, शैक्षणिक तसेच वंचित घटकांसाठी काम करत आहे. या कामाची दखल या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे घेतली गेली आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. उद्धव शिंदे यांनी दिली.