नगरमध्ये मोबाईल चोरणारा अट्टल चोरटा पकडला

0
20

४ मोबाईल तक्रारदारांना केले परत

नगर – नगर शहरात नागरिकांचे मोबाईल चोरणारा अट्टल चोरटा कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडला असून त्याच्याकडून चोरीचे ४ महागडे मोबाईल हस्तगत करत ते तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत. सचिन सुभाष दाते (वय २१, सध्या. रा.आशिर्वाद कॉलनी, सारसनगर, मूळ रा. घोडेगांव रोड, मंचर ता. आंबेगाव, जि. पुणे) असे या आरोपीचे नाव आहे. नगर-दौंड रोड समाधान हॉटेलसमोर राहणारे संतोष जानराव शिंदे हे त्यांचे राहते घरी झोपलेले असतांना एका अज्ञात आरोपीने त्यांचा व उमेश शिंदे याचा मोबाईल चोरी केला होता. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास सुरु असताना ही चोरी सचिन दाते याने केल्याचे तांत्रिक तपासात पुढे आले. त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. राजेंद्र गर्गे, पो. हे.कॉ. गाडीलकर, शाहीद शेख, सागर पालवे, पो. ना. योगेश कवाष्टे, पो. कॉ.दिपक रोहकले, तानाजी पवार, सत्यजित शिंदे, सुरज कदम, शिवाजी मोरे, सोमनाथ केकान, अतुल काजळे, अशोक कांबळे, राजेंद्र पालवे, महेश पवार यांच्या पथकाने त्याचा शोध घेवून त्याला शिताफीने पकडले. त्याच्याकडून ४ मोबाईल फोन व मोटार सायकल असा ऐवज हस्तगत करण्यात आला. चोरीचे मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत.