प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसाटीच्यावतीने दिपोत्सव

0
49

नगर – अयोध्या येथील कारसेवेस गेलेल्या कारसेवकांचा सत्कार करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्ये करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्यावतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पाहुण्यांनी जय श्रीराम…जय श्रीराम च्या घोषणा देत कारसेवकांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष दि.ना.जोशी होते. यावेळी राष्ट ्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह हिराकांत रामदासी, कारसेवक राजेंद्र जोशी, भारत भागवत, मुळदेव निक्रड, संस्थेच्या अध्यक्ष विजया रेखी, सुनिल रुणवाल, किरण वैकर, प्राचार्य सुनिल पंडित, मुख्याध्यापिका प्रतिभा धरम आदिंसह शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अक्षता कलशाचे पुजा व पणत्या लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हिराकांत रामदासी यांनी श्रीराम जन्मभुमी अयोध्या येथे मंदिर उभारण्यासाठी गेली ५०० वर्षे होत असलेल्या संघर्षाचा धावता आढावा घेतला. ते म्हणाले, लाखो हिंदूंच्या बलिदानानंतर अयोध्येत प्रभु रामचंद्रांचे मंदिर उभे राहणे ही करोडो भारतीयांची इच्छा प्रत्यक्षात आली आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळा सवारनी आनंदाने साजरा करावा. २२ जानेवारी रोजी सर्व नागरिकांनी घरात व परिसरात दिपोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. दि.ना.जोशी म्हणाले, अयोध्येमधील अनेक वर्षे नागरिकांनी संघर्ष करत कारसेवा केली. या कारसेवेमध्ये नगरमधून मोठ्या संख्येने हिंदूत्ववादी नागरिक आयोध्येत गेले होते. यामध्ये आमच्या संस्थेचे प्राचार्य सुनिल पंडित यांचाही समावेश असल्याचा अभिमान आम्हाला आहे. या कारसेवकांनी केलेल्या संघर्षामुळेच आज राम मंदिराचे स्वप्न पुर्ण झाले आहे. प्रास्ताविकात सुनिल पंडित म्हणाले, १९९२ साली बाबरी मस्ज़िदचा ढाचा पाडण्यासाठी नगरमधून मोठ्या प्रमाणात कारसेवक अयोध्येत गेले होते. या सर्व कारसेवकांचे कार्य व धाडस कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्ये करत प्रतिकात्मक स्वरुपात काही कारसेवकांचा सत्कार प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्यावतीने केला आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप रोकडे यांनी केले तर गौतम कराळे यांनी आभार मानले.