श्री एकदंत गणेश मंदिराच्यावतीने श्रीराम प्राण प्रतिष्ठान सोहळा साजरा

0
45

प्रभू श्रीरामांना १२२ भोग नैवेद्य; प्रभू श्रीरामांचे परिसरातून मिरवणूक

नगर – प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला आहे. श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झालेत. त्यानिमित्ताने दातरंगे मळा, एकदंत कॉलनी येथील श्री एकदंत गणेश मंदिराच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या भेी भावाने हा उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये प्रभू श्रीरामांना १२२ भोग नैवेद्य, सांस्कृतिक कार्यक्रम बेाम्मा, प्रभू श्रीरामांचे मिरवणूक, महाआरती, महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. श्री एकदंत गणेश आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आले. प्रभू श्रीरामांचे चार फुटी मूर्ती लावण्यात आली. मंदिर परिसरात सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले.भव्य रांगोळी काढण्यात आली. यावेळी प्रभू श्रीरामांना १२२ महिलांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या १२२ पदार्थ भोग नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम बेाम्मा खेळण्यात आला. या खेळात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. श्री एकदंत गणेश मंदिराच्या वतीने प्रभू श्रीरामांचे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बालकांनी प्रभू श्री राम, लक्ष्मण, सीता, हनुमान वेशभूषा धारण करून सहभागी झाले. मिरवणूक मार्गावर भव्य रांगोळी काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

सर्व महिलांनी केसरी रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. पुरुषही मिरवणुकीत सहभागी झाले होते. पुरुषांनी डोयावर भगव्या टोप्या व गळ्यात भगव्या पंचा घातल्या होत्या. ही मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात व फटायांच्या आतिषबाजीने, प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने दातरंगे मळा परिसरात काढण्यात आली. मिरवणुकीने सवारचे लक्ष वेधले व दातरंगे मळा परिसरात भेीमय वातावरण निर्माण झाले होते. मिरवणूक संपन्न झाल्यानंतर डान्स मनोरंजन कार्यक्रम पार पडला. यामध्ये परिसरातील बालकांनी आपली कला सादर करून भाविकांचे मने जिंकली. प्रभू श्रीरामांची व श्री गणेशाची महाआरती करून भाविकांना महाप्रसाद (भंडारा) वाटप करण्यात आले. यावेळी असंख्य भावीक भेांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री एकदंत गणेश मंडळ व श्री एकदंत महिला बचत गटाच्या कार्यकत्यारनी विशेष परिश्रम घेतले.