शहरातील राधाकृष्ण मंदिरात प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा

0
37

नगर – शहरातील पंजाबी सनातन धर्म सभेच्या राधाकृष्ण मंदिरात सोमवारी (दि.२२ जानेवारी) अयोध्या येथील राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला. श्रीराम जय राम जय जय रामच्या! घोषाने मंदिर परिसर दणाणला. भेी वातावरणाने राममय झालेल्या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. राधाकृष्ण मंदिर ट ्रस्ट, पंजाबी सेवा समिती, सेवाप्रीत व समर्पण ग्रुपच्या सहकार्याने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात सकाळी हनुमान चालिसाचे पठण व रामनामाचा जप पार पडला. हनुमान सत्संग मंडळाच्या कलाकारांनी भगवान श्रीरामच्या गीतांनी वातावरण प्रफुल्लीत केले होते. उपस्थित भाविक व महिलांनी भेी गीतांवर ठेका धरला होता. या कार्यक्रमात लहान बालके देखील श्रीरामच्या वेशभुषेत उपस्थित होते. राम आएंगे…, मेरी झोपडी के भाग खुल गए…, सिया राम जय राम… आदी गीतांनी वातावरण प्रफुल्लीत झाले होते.

श्रीराम जय राम जय जय रामच्या! घोषाणे मंदिर परिसर दणाणला, कारसेवकांचा झाला सन्मान

तर मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अयोध्या येथे राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा लाईव्ह सोहळा पाहण्यासाठी भाविकांना मोठ्या स्क्रिनवर व्यवस्था करण्यात आली होती. अयोध्येतील मंदिरात विराजमान झालेल्या प्रभू श्रीरामच्या मुर्तीचे दर्शन होताच उपस्थित भाविकांनी जय श्रीरामचा एकच गजर केला. या सोहळ्यास उपस्थित कारसेवक अनिल सबलोक यांचा मंदिराच्या वतीने सन्मान करण्यात आला. सबलोक यांनी अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीत असंख्य कारसेवकांचे मोलाचे योगदान असल्याचे स्पष्ट करुन १९९२ ला कारसेवा करताना आलेले अनुभव विशद करताच उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. मंदिर ट ्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व सर्व विश्वस्तांनी सहकुटुंब प्रभू श्रीरामची महाआरती केली. या कार्यक्रमास मोहन मानधना, अनिल पोखरणा व समाजातील ज्येष्ठ व्येी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाविकांना यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.