जिल्हा खरेदी-विक्री संघाच्या १९ जागांसाठी ६२ अर्ज वैध

0
46

सर्वसाधारणच्या ७ जागा होणार बिनविरोध; नगर,कर्जत श्रीगोंद्यात मोठी चुरस

नगर – अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या (जिल्हा खरेदी-विक्री संघ) संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी दाखल झालेले ६२ उमेदवारी अर्ज वैध ठरलेले असून यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातील ७ जागा बिनविरोध होणार आहेत. तर सर्वसाधारणच्या नगर, कर्जत, श्रीगोंदा मतदार संघात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीबरोबरच जिल्हा खरेदी विक्री संघाची निवडणुक १८ फेब्रुवारी रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ७५० सेवा सोसायट्या या सभासद असून त्यांनी ठराव केलेल्या संचालकाला या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. संघाच्या १४ तालुयांसाठी प्रत्येकी १ अशा १४ सर्वसाधारण मतदार संघाच्या जागा आहेत. तर महिला राखीव २, अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग १, इतर मागास प्रवर्ग १ व विमुे जाती भटया जमाती १ अशा १९ जागा आहेत. यातील सर्वसाधारण मतदार संघात अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, पारनेर या ७ ठिकाणी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल असल्याने या जागा बिनविरोध होणार आहेत. तर उर्वरित नगर ५,कर्जत ४, श्रीगोंदा ६, जामखेड २, नेवासा ३, राहाता ३, श्रीरामपूर २, असे अर्ज दाखल आहेत.

इतर मागास प्रवर्गात सर्वाधिक अर्ज

इतर मागास प्रवर्गात १ जागेसाठी सर्वाधिक १७ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. या शिवाय महिला राखीव २ जागांसाठी ७, अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग १ जागेसाठी ३ व विमुे जाती भटया जमाती १ जागेसाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. एकूण १९ जागांसाठी ६२ उमेदवारी अर्ज वैध ठरलेले असून अर्ज मागे घेण्यासाठी ५ फेब्रुवारीपयरत मुदत आहे, ६ फेबु्रवारीला चिन्हवाटप होवून १८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी मतदानानंतर मतमोजणी होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शुभांगी गोंड या काम पाहत आहेत.