श्रीकांत शिंदे फौंडेशन व शिवसेनाच्यावतीने श्री प्रभू श्रीरामचंद्र दर्शन सोहळ्यात कारसेवकांचा सत्कार

0
29

नगर – सावेडीतील प्रोफेसर कॉलनी येथे डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन व शिवसेना उपनगरच्यावतीने श्री प्रभू श्रीरामचंद्र दरबार दर्शन सोहळ्यात कारसेवक अ‍ॅड. अभय आगरकर, श्रीराम येंडे, मधुसूदन मुळे यांचा सत्कार करून त्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली. बापू ठाणगे, शिवसेना दिलीप सातपुते, सावेडी उपनगर शिवसेना प्रमुख काका शेळके, सावेडी शिवसेना प्रवेा विशाल शितोळे, वैदयकीय मदत कक्षाचा जिल्हाप्रमुख अनिकेत कराळे, अनिरूध्द गायकवाड, हिंदू राष्ट ्र सेनेचे दिगंबर गेंट्याल आदींसह भाविक उपस्थित होते. मधुसूदन मुळे म्हणाले की, आज रामाचे मंदिर होत आहे. हजारो कारसेवकांनी याकरीता बलिदान दिले आहे. विशाल शितोळे तसेच अनिकेत कराळे यांनीही मनोगत व्ये करत भाविकांचे आभार मानले. सकाळी ९ ते रात्री ९ पयरत विविध भजनी मंडळानी आपली भजनसेवा दिली.

प्रथमत श्रीराम जय राम जय जय राम तसेच रघुपती राघव राजाराम यांचे नामस्मरण करण्यात आले. तसेच रेणूका मिसाळ, वेदमूर्ती निसळ गुरूजी यांनी यावेळी सामूहीक रामरक्षेचे पठण केले. हिदू जनजागृती समितीचे प्रवेे रामेश्वर भुकन यांनी हिंदू राष्ट ्राची शपथ घेतली. शिल्पकार चित्रकार प्रमोद कांबळे अयोध्येमध्ये रामायणातील विविध प्रसंगावर आधारित १०० देखावे तयार करून अयोध्येमध्ये विराजमान करणार आहेत यापैकी १४ देखावे अयोध्येला रवाना झाले असून त्यापैकी श्रीराम दरबार या नयन सुंदर देख्याव्याची प्रतिकृती रामभेाच्या दर्शनासाठी प्रोफेसर कॉलनी चौक येथे तात्पुरत्या स्वरूपात स्थापित केली आहे. या देखाव्यात प्रभू श्रीरामचंद्र, सीताबाई हे सिंहासनावर विराजमान झाले होते. तसेच राम भे हनुमान, लक्ष्मण, भरत यांचेही शिल्प या देखाव्यात होते. हे पाहण्यासाठी नगरकरांनी गर्दी केली होती. या निमित्त दिवसभर भजन व नामस्मरण करण्यात आले.