श्री शनी मारुती मंदिराच्या भिंतीवर साकारणार भव्य शिवसृष्टी

0
30

दिल्लीगेट येथील श्री शनी मारुती मंदिराच्या द्वारासमोर साकारली राम जन्मभूमी मंदिराची भव्य दिव्य प्रतिकृती

नगर – शहरातील दिल्ली गेट परिसरात श्री शनी मारुती मंदिराच्या द्वारासमोर विश्वस्त मंडळाचे सदस्य अश्विन सातपुते यांच्या पुढाकारातून प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधत भव्य असे राम मंदिर प्रतिकृती देखावा उभारण्यात आला असून. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी येथील उपस्थितांनी जय श्रीराम.. प्रभू श्री रामचंद्र की जय.. सियावर रामचंद्र की जय.. अश्या जय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. राम मंदिर प्रतिकृती देखावा हा नागरिकांसाठी ३० जानेवारी पर्यत ठेवण्यात येणार आहे. नगर शहरातील दिल्ली गेट परिसरातील श्री शनि मारुती विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदिरात राम प्राणप्रतिष्ठापने सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, राष्ट ्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत प्रमुख नानासाहेब जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

मंदिर समितीच्या वतीने उपस्थित पाहुण्यांना श्रीरामचंद्रप्रभू यांचा श्रीरामचरितमानस ग्रंथ व शाल देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी चंद्रकांत आकडे, अध्यक्ष मच्छिंद्र डवरे, उपाध्यक्ष लक्ष्मण इगे, सचिव अतुल पिंपरकर, सहसचिव महेंद्र मानकर, खजिनदार बाळू सांगोळे, सहखजिनदार सागर गुंजाळ, कायदेशीर सल्लागार सुभाष मानकर, सदस्य माधव टांगसाळे, अश्विन सातपुते, अमोल नागापुरे, सेवक, सर्व मित्रमंडळी, वाबळे कन्स्ट ्रशन चे संचालक भैय्या वाबळे व आदेश लांजेकर (शहर प्रचारक राष्ट ्रीय स्वयंसेवक संघ) वर्धमान पितळे (कार्यवाह, केशवनगर राष्ट ्रीय स्वयंसेवक संघ),निलेश लोढा (संघ स्वयंसेवक) शनि मारुती मंदिर विश्वस्त मंडळ, दिल्लीगेट, काशीविश्वेश्वर मित्र मंडळ व तोफखाना तरुण मंडळचे सर्व सदस्य उपस्थित होते.

श्री शनि मारुती मंदिराच्या भिंतीवर शिवसृष्टी साकारणार

आ. संग्राम जगताप यांनी श्री शनि मारुती मंदिराच्या भिंतीवर शिवसृष्टी साकारणार असून दिल्लीगेट परिसराला ऐतिहासिक वारसा असून त्याला एक महत्व आहे. या भागात नेहमीच नागरिकांची वर्दळ सुरु असते, या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जोपासण्याचे काम केले जाईल, शिवसृष्टीने शहराच्या विकासात आणखीन भर पडणार आहे असे ते म्हणाले.