‘नगरच्या युगंधर वाद्य पथका’तर्फे श्री विशाल गणेश मंदिरात दिपोत्सव

0
7

नगर – ऐतिहासिक श्रीराम मंदिर व प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अयोध्या येथे झाला. संपूर्ण देशात श्रद्धामय वातावरण तयार झाले. या पार्श्वभूमीवर या उत्कट अशा भिेमय सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी युगंधर वाद्य पथकाने नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती येथे भव्य दीपोत्सव साजरा केला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर व पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते. या उपक्रमात आकाश पटवेकर, शुभम भिसे, संकेत पुजारी श्रीपाद देवकर, रणवीर शितोळे, अनिकेत फुंदे, पवन माने, शशिकांत लोटके, पुष्कर बडवे, नेहा जग्गी, प्राची बेलेकर, श्रुती विश्वास, श्रेया विश्वास, संस्कृती बारस्कर, वैष्णवी पाटील, राजवर्धन बारस्कर, पौर्णिमा देवच क्के, मयुरी पाटील, वैष्णवी शिंदे, अथर्व पुराणिक, अनिरुद्ध बोगा, प्रथमेश बर्डे, निधी केवळ, सिद्धी पेंटा, निलेश भालेराव, सुरज पालवे, आकाश सोनवणे, शुभम झिंजाडे, सुमित सोनवणे,शिवाजी राजपुरे, तेजल बडवे, मानसी भागवत, आकाश धोका आदि सहभागी झाले होते.

प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार आहेत श्री विष्णूंचे आठवे अवतार म्हणजे जगद्गुरु श्रीकृष्ण. श्रीकृष्ण म्हणजेच युगंधर यामुळेच युगंधर वाद्य पथकाने प्रभू श्रीराम यांना मानवंदना म्हणून हा दीपोत्सव साजरा केला. युगंधर वाद्य पदकाच्या दैदीप्यमान यशामध्ये व जडण-घडणीमध्ये साक्षीदार असणार्‍या ग्रामदैवत विशाल गणपती यांच्या समोर प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणेचा आनंद मंगलमय व पवित्र वातावरणात युगंधर वाद्य पदकाच्या वादकांनी आगळा-वेगळ्या दिपोत्सव साजरा करुन केला.