येणाऱ्या नव्या रामराज्यासाठी सज्ज व्हा

0
7

जय श्रीरामच्या जयघोषात गौरीशंकर मित्र मंडळाच्या श्रीराम दरबार देखाव्याचे उद्घाटन

नगर – देशात पुन्हा प्रभूश्रीरामाचे आगमन झाले आहे. लवकरच देशात नवे रामराज्यही येणार आहे. या नव्या रामराज्याचे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज होवू. रामराज्यात सवारचे कल्याण होणार आहे. नगर शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर आहे. आनंदीबाजार ते सीना नदीपयरत भूमिगत गटारीचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वसंत लोढा यांनी सतत पाठपुरावा केला आहे. यासाठी निधी मंजूर केला आहे. वसंत लोढा यांनी श्रीराम दरबार देखावा व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हा परिसर राममय करून टाकला आहे, असे प्रतिपादन खा.डॉ.सुजय विखे यांनी केले. गौरीशंकर मित्र मंडळ ट ्रस्ट व पंडीत दीनदयाळ परिवाराच्यावतीने अयोध्येत झालेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम दरबार देखाव्याचे उद२घाटन व श्रीराम पंचायत मुत्यारचे पूजन खा.डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत श्रीराम पूजनही झाले.

यावेळी श्री रामचंद्र सत्संग संगीत कार्यक्रम उपस्थित सवारनी ताल धरला. ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराजांच्या हस्ते सत्संग जागरणाची ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक वसंत लोढा, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे सचिव विकास पाथरकर, नगरसेवक सुभाष लोंढे, दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे, सचिव बाळासाहेब भुजबळ, रेव्हरंट साळवे, माजी पोलीस निरिक्षक शेख, रूपसिंग कदम, जाफर बागवान, करीम खान, जॉन खरात आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात वसंत लोढा म्हणाले, आनंदीबाजार परिसर सखल भाग असल्याने येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येत असते. नागरिकांच्या घरात पाणी शिरून रस्त्यावरील गाड्याही वाहून जातात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

गेले अनेक वर्षापासून ही समस्या सुटण्यासाठी प्रयत्न केले. पण यश आले नाही. मात्र भाजपाचे खा.सुजय विखे यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने त्यांनी या भागाच्या भूमिगत गटारीसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. आज राममंदिर उद२घाटन सोहळ्या निमित्त ही घोषणा करणात मला आनंद होत आहे. श्रीराम मंदिराचा आनंदोत्सव याभागातील नागरिकांनी उत्साहात साजरा केला आहे. यावेळी संजय वल्लाकट्टी, विवेक नाईक, नरेंद्र श्रोत्री, निलेश लोढा, सुहास पाथरकर, बाळासाहेब खताडे, मयूर बोचूघोळ, सुरेश नामदे, उज्वला भांगे, आरती आढाव, कालिंदी केसकर, शारदा होशिंग, निलेश लाटे, सुखदेव दरेकर, सागर शिंदे, पारस लोढा, शोभा देवतरसे, कांचन तांबोळी, नंदा देवतरसे, शिल्पा गणगले आदींसह भाविक उपस्थित होते.