वीटभट्टी चालकाची पावणे दोन लाखांची रोकड गेली चोरीला

0
66

नगर – केडगाव उपनगर परिसरात ओंकारनगर येथील पवार मळ्यात कामगाराने घराच्या कपाटात ठेवलेली वीटभट्टी चालकाची १ लाख ७० हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. चोरीच्या घटनेनंतर वीटभट्टीवर काम करणारे २ कामगारही बेपत्ता झाले असून त्यांनीच हे पैसे चोरल्याचा संशय व्ये करण्यात येत आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भाऊसाहेब सोपानराव मोरे (वय-४८, रा. पवारमळा, ओंकारनगर, केडगांव, मुळ रा. औदयोगिक वसाहत, संजीवनी कारखान्याजवळ, कोपरगांव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे गेल्या ३ वषारपासून केडगाव येथे राजेंद्र रामचंद्र पवार यांच्या वीटभट्टी काम करत असून तेथेच कुटुंबासह राहात आहेत. वीटभट्टी चालक पवार यांचे ट ्रकवर सुरेश आहेर हा चालक म्हणुन काम करत असुन तो फिर्यादीच्या शेजारीच राहण्यास आहे. दि. १५ जानेवारीला सायंकाळी ६.४५ च्या सुमारास सुरेश आहेर हा विटा खाली करून पवार मळा, केडगांव येथे विटाचे बिलाचे पैसे घेवून आला होता.

त्यावेळी विटभट्टीचे मालक राजेंद्र पवार हे विटभटटीवर हजर नव्हते, तेव्हा सुरेश आहेर याने विटाचे बीलाचे पैसे देण्यासाठी राजेंद्र पवार यांना फोनकरुन सांगितले की, मला बाहेरगावी जायचे आहे, विटाचे बिलाचे पैसे मी भाऊसाहेब मोरे कडे देतो, असे सांगितल्यानंतर राजेंद्र पवार यांनी मोरे यांना फोनवर विटाचे बिलाचे पैसे सुरेश आहेर कडुन घेवुन तुझ्याकडे ठेव मी आल्यावर तुझ्याकडुन घेतो, असे सांगितले. त्यानंतर सुरेश आहेर याने मोरे कडे एकूण १ लाख ७० हजार रुपये दिले. त्यानंतर मोरे यांनी ते पैसे घरातील कपाटाच्या ड्रोवरमध्ये ठेवले. रात्री मोरे झोपल्यानंतर अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करत ते पैसे चोरून नेले. चोरीची ही घटना १६ जानेवारीला सकाळी उघडकीस आली. त्यानंतर मोरे यांनी शेजारी राहणारे कामगार रामा शंकर भंवर व सुनिल बाबुराव सोनवणे यांच्या कडे चौकशी करण्यासाठी गेले असता ते दोघेही बेपत्ता होते. त्यांचे मोबाईलही बंद लागत होते. त्यांचा ३ दिवस सर्वत्र शोध घेवून ते न सापडल्याने फिर्यादी मोरे यांनी मालक राजेंद्र पवार यांना सर्व प्रकार सांगून कोतवाली पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून दोघा संशयितांचा शोध सुरु केला आहे.