शहरातील पुरातन श्रीराम मंदिर अडकलेयं ‘घाणीच्या विळख्यात’

0
32

नगर – दोन महिने उलटूनही पुरातन श्रीराम मंदिराच्या स्वच्छतेबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. गटार तुंबल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे नागरिकांचे आरो१/२य धोयात आले आहे. याबाबत तक्रार करूनही नगरसेवकासह महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पंतप्रधानांच्या मंदिर स्वच्छतेच्या अभियानाला नगरमधील आमदार, खासदार, मंत्री साथ देत नसल्याचेच यावरुन स्पष्ट होत आहे. नगर शहरातील चितळे रोड परिसरात असणार्‍या पुरातन श्रीराम मंदिरातील गटार चोकअप झाल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच मंदिरालगतच सांडपाण्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. त्याचबरोबर बसविलेले फरशीही निसरडी झाल्याने भाविकांना मंदिरात आल्यानंतर चालताना मोठी काळजी घ्यावी लागत आहे.

त्यामुळे परिसरात दुगरधी, डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, डासांच्या अळ्यांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होत आहे. मंदिरात येणार्‍या भाविकांचा श्वास गुदमरत आहे. या मंदिरात दररोज भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. येथे २२ जानेवारीला अयोध्यातील होणार्‍या श्रीराम मंदिराच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पण या घाणीच्या साम्राज्यामुळे भाविकांमध्ये अस्वस्थता आहे. येथे हनुमान चालीसाचेही पठण केले जाते. त्याचबरोबर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होत असतो. सध्या या मंदिरातील गटार चोकअप झाल्याने घाण पाणी पसरले आहे. या दुगरधीमुळे परिसरातील नागरिक व व्यावसायिकांना विविध आजारांना सामना करावा लागत आहे.