प्रभू श्री रामलल्ला मिरवणुकीने दणाणला केडगाव परिसर

0
17

नगर – श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा उत्सव पार्श्वभूमीवर केडगाव येथील सरस्वती प्राथ. माध्य आणी उच्च माध्यमिक विद्या मंदिरामध्ये मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीमध्ये श्रीराम, लक्ष्मण, भरत, सीता, हनुमान ही पात्रे मुलांनी सकारली होती तसेच शबरी, जटायु, वाशिष्ट ऋषी, जांबुवंत, अंगद इत्यादी रामायनातील वेशभूषा विद्याथ्यारनी सकारल्या होत्या. मिरवणूक भुषणनगर मार्गे अयोध्यानगर येथील राम मंदिर अशी वाटचाल करत असताना वाटेत ठिकठिकाणी फाटयांच्या अतिशबाजी मध्ये स्वागत करण्यात आले तसेच श्रीराम यांना औक्षण देखील केले.

मिरवणूक मध्ये असणारी छोटी वानरसेना प्रमुख आकर्षण ठरली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवान, दत्ता जगताप, उद्योजक जालिंदर कोतकर, संभाजी पवार, सुजय अनिल मोहिते, रमेश हिवाळे, सौरभ हिवाळे, आदित्य बोरा, बाळकृष्ण ठुबे, मंगेश चोपडे, श्रीमती कारले, मुख्याध्यापक संदीप भोर सर, मुख्याध्यापिका श्रीमती धर्माधिकारी, शिक्षक वृंद, कर्मचारी, पालक उपस्थित होते. अयोध्यानगर येथील श्रीराम मंदिरात मिरवणुकीचे आगमन झाल्या नंतर परिसरातील जनतेने उत्साहात स्वागत केले आणि श्रीरामाच्या आरतीने मिरवणुकिचे विसर्जन करण्यात आले नंतर सवारना खाऊ वाटप करण्यात आला.