रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त २१ जानेवारीला रात्री १२ वाजेपर्यंत लाऊड स्पीकरला परवानगी द्यावी

0
51

शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नगर – २२ जानेवारी रोजी आयोध्या येथे प्रभु श्री रामचंद्र प्राणप्रतिष्ठा होत आहे, त्यानिमित्त विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, त्यासाठी लावण्यात येणार्‍या लाऊड स्पिकरसाठी रात्री १२ वाजेपयरत परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने शहरप्रमुख संभाजी कदम यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देऊन चर्चा केली. याप्रसंगी शुभम कोमाकुल, मयुर जंजाळे, शुभम थोरात, केशव मोकाटे, सोमा खताडे आदि उपस्थित होते. यावेळी संभाजी कदम म्हणाले, देशातील सर्वात मोठा उत्सव आयोध्यातील श्रीराम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

नगर शहरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध मंदिरांच्यावतीने या सोहळ्याची तयारी सुरु झाली असून, त्यानिमित्त होणार्‍या कार्यक्रमात लाऊड स्पीकर लावण्यात येणार आहे. २२ जानेवारी रोजी संपूर्ण दिवस व रात्रभर धार्मिक कार्यक्रम होणार आहे, हे कार्यक्रम रात्री १२ पयरत सुरु राहणार असल्याने त्यासाठी लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी मिळवी, असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या सोहळ्यात नगर शहरातील नागरिकांनी सहभागी होत दुपारी आरती, सायंकाळी दिपोत्सव व रात्री भजने आदि कार्यक्रमात सहभागी होऊन हा सोहळा अभुतपूर्व करावा, असे आवाहन संभाजी कदम यांनी केले.