रात्रीच्यावेळी संशयीतरित्या फिरणाऱ्या दोघाांना पकडले; २ मोटारसायकली जप्त

0
26

नगर – रात्रीच्या वेळी उपनगरी भागात संशयीतरित्या दुचाकी घेऊन फिरणार्‍या नेवासा, राहुरीच्या दोघांना तोफखाना पोलिसांच्या रात्र गस्त पथकाने पकडले. त्यांच्याकडील दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस अंमलदार संदीप धामणे, वसीम पठाण, सतीष त्रिभुवन, सतीष भवर यांचे पथक गुरूवारी (दि.१८) रात्री तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना रात्री दीडच्या सुमारास तारकपूर रस्त्याकडे जाणार्या रस्त्यावर मिस्किन मळा परिसरात एक युवक दुचाकी लोटत घेऊन जाताना मिळून आला.

त्याने त्याचे नाव अजय विष्णु सरोदे (वय २०, रा. टाकळिमियाँ, मुसळवाडी रस्ता, ता. राहुरी) असे सांगितले. त्याच्याकडील दुचाकीबाबत त्याला विचारणा केली असता त्याला काही एक सांगता आले नाही. पोलिसांनी दुचाकी जप्त केली असून पोलीस अंमलदार भवर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. भिस्तबाग चौक येथील पडया महालाजवळ एका संशयीत पोलिसांना दुचाकीसह मिळून आला. त्याने त्याचे नाव वैभव सुरेश कांबळे (वय २१, रा. वाटेफळ ता. नेवासा) असे सांगितले. त्याच्याकडील दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याला काही एक सांगता आले नाही. पोलिसांनी दुचाकी जप्त केली असून पोलीस अंमलदार त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.