महापालिका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा बेपत्ता

0
29

नगर – महानगरपालिका सफाई कर्मचार्‍याचा अल्पवयीन मुलगा (वय १७) सिध्दार्थनगर परिसरातून बेपत्ता झाला असून त्यास अज्ञात व्येीने पळवून नेल्याच्या संशयावरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्येी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्या मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी बुधवारी सकाळी त्यांच्या अल्पवयीन मुलाला पेपर जवळ आले असल्याने केस कापण्यास सांगितले. त्यानंतर तो‘मला केस कापायचे नाही’, असे म्हणून घरातून निघून गेला. बराच वेळ झाल्यानंतर देखील तो घरी न आल्याने फिर्यादीने त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. फिर्यादी यांनी गुरूवारी तोफखाना पोलिसांना माहिती देत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस मुलाचा शोध घेत आहे.