दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसंदर्भात नामदार अजित पवार यांना साकडे

0
74

राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे अध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांचे निवेदन

नगर – स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, नगरपालिका महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांगाचा एक स्वीकृत सदस्य घेण्यात यावा. संजय गांधी निराधार योजनेवरती दिव्यांगा चा ह क्काचा प्रतिनीधी असावा. तसेच संजय गांधी योजनेचे दर महिन्याला येणारे मानधन एक ते सात तारखेच्या आत त्वरित दिव्यांगाच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे. तसेच ते मानधन पंधराशे रुपये वरून तीन हजार रुपये करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन राष्ट्र वादी काँग्रेस अपंग सेलचे अध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांनी श्रीगोंदा येथे झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय  अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

निवेदनात अहमदनगर महापालिकेचा दिव्यांगांचा निर्वाह भत्ता त्वरित मिळावा, पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांगांना आर्थिक लाभ देण्यात यावा. तो वस्तु ऐवजी रोख स्वरूपात वार्षिक बजेटमध्ये त्याचा सामावेश करण्यात यावा. तसेच ग्रामीण व शहरी दिव्यांगाना विनाअट घरकुल देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. अजित पवार म्हणाले की, या सर्व मागण्यांचा मी अभ्यास करून त्वरित योग्य तो निर्णय घेण्यात येईल. यावेळी आ. संग्राम जगताप, शहर अध्यक्ष अभिजीत खोसे, जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, आमदार निलेश लंके, दौड चे माजी आमदार रमेश थोरात, अपंग सेलचे उपाध्यक्ष बाबासाहेब शेख, खजिनदार चंद्रकांत वाघमारे, सचिव शेखर बोत्रे आदी उपस्थित होते.