गरोदर पत्नीचा खून करणाऱ्यास १० वर्ष सेमजुरी व १५ हजाराचा दंड

0
14

नगर – चारित्र्यावर संशय घेवून गरोदर पत्नीला जीवे मारल्याच्या गुन्ह्यात आरोपी पतीला नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती माधुरी ए.बरालिया यांनी १० वर्षाची सेमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पोपट उर्फ नाना मारुती जाधव (वय ३७, रा. ठाकरवाडी, ता. राहुरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना २९ मार्च २०२१ रोजी रात्री घडली होती. आरोपी पोपट उर्फ नाना मारुती जाधव याने त्याची गर्भवती पत्नी नंदा पोपट जाधव हिस तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिचे पोटात, छातीत व शरीरावर इतर ठिकाणी लाथाबुयाने जोरजोरात गंभीर स्वरूपाची मारहाण करून तिला गंभीर जखमी करून तिला व तिचे पोटातील पाच महिने वयाचे अर्भकास जीवे ठार मारले. त्यानंतर तिचे प्रेत कोणाला मिळून येऊ नये व पुरावा नष्ट व्हावा म्हणून दि.३० मार्चला पहाटे पाच वाजताच्या सुमारास मयत नंदा हिचे प्रेत आरोपीने मोटार सायकलवर नायलॉन दोरीच्या साह्याने बांधून पाईनचा तलाव धोत्रे बुद्रुक (ता.पारनेर) येथे घेऊन गेला.

तेथे प्रेतास बांधून आणलेल्या दोरीच्या साह्याने तिच्या पोटाला मोठा दगड बांधून प्रेत पाण्यात टाकून दिले होते. याबाबत मयत नंदा हिचा भाऊ सुरेश सिताराम केदार याने दिलेल्या फिर्यादनुसार पारनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पारनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केला. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. या साक्षीदारांनी दिलेले पुरावे, दाखल केलेली कागदपत्रे आणि परिस्थितीजन्य पुरावे हे आरोपीविरुद्ध गुन्हा शाबित करण्याकामी सबळ व पुरेशी असल्याने न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधानचे कलम ३०४ अन्वये दोषी धरून १० वर्षे सेमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी अभियोेा केदार केसकर यांनी कामकाज पाहिले. अ‍ॅेड. केसकर यांना पैरवी पोलीस एस. एन. बडे व के. एन. पारखे यांनी मदत केली.