गुरु गुरुगोविंदसिंग जयंतीनिमित्त समाजातील सेवादारांचा सन्मान

0
21

नगर – शीख समाजाचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंग यांची जयंती तारकपूर येथील गुरुद्वारा भाई कुंदनलालजी मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. अखंडपाठ, किर्तन व प्रवचनांच्या भेीमय वातावरणात हा सोहळा पार पडला. जयंतीनिमित्त समाजातील सेवादारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पंजाबी, शीख व सिंधी समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. गुरुद्वारामध्ये गुरु गुरुगोविंदसिंग यांच्या जयंतीनिमित्त दिवाण कीर्तन ग्यानी पदमसिंहजी आणि अमृतसर येथून आलेले बेबी दीप कौरजी, कुलविंदरसिंगजी यांच्या जथ्थाचे किर्तन झाले. किर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमात गुरुनानक देवजी ग्रुप (जीएनडी) च्या माध्यमातून सामाजिक कार्यात योगदान देणारे अनिश आहुजा, करण आहुजा व कोरोना काळात लंगर सेवेत योगदान देणारे करणसिंग धुप्पड यांचा सन्मान बाबा कर्नलसिंगजी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जनक आहुजा, हरजीतसिंग वधवा, नगरसेवक अमोल गाडे, इंद्रजीत नय्यर, राजीव बिंद्रा, राजू जग्गी, प्रशांत मुनोत, प्रितपालसिंग धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, संजय आहुजा, रवी बक्षी, आगेश धुप्पड, ब्रिजमोहन कंत्रोड, जसपाल कुमार, राकेश गुप्ता, जतीन आहुजा, अभिमन्यू नय्यर, विकी कंत्रोड, गुलशन कंत्रोड, जयेश कंत्रोड, जयकुमार रंगलानी, गौरव कंत्रोड, पियुष कंत्रोड, सौरभ आहुजा, आशिष गुप्ता, दिनेश कंत्रोड, सागर कुमार आदी उपस्थित होते. जयंती निमित्त सकाळपासूनच अखंडपाठ साहेब, किर्तन दरबार आदी विविध धार्मिक कार्यक्रम गुरुद्वारा येथे पार पडले. जनक आहुजा परिवाराच्या वतीने भाविकांसाठी लंगरचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमासह लंगरचा भाविकांनी लाभ घेतला.