गुरु गोविंदसिंगजी महाराज यांची ३५७ जयंती विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी

0
25

गुरुद्वारा भाई दयासिंगजी गोविंदपुरा येथे गेल्या ८ दिवसापासून शीख,पंजाबी, सिंधी बांधव एकत्र येऊन विविध धार्मिक कार्यक्रम राबवत १० वे गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची ३५७ जयंती साजरी केली
आहे. यामध्ये प्रभात फेरी, अखंडपाठ, लहान मुलांची कीर्तन सेवा, पदमसिंग जथ्था आणि पंजाबचे संत सुरेंद्रसिंग जथ्था यांनी कीर्तन व प्रवचनाद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी समाजाचे प्रधान सरदार बलदेवसिंग
वाही यांच्यावतीने सर्व नगरकरांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाविकांसाठी गेल्या ८ दिवसापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते असे ते म्हणाले.