‘सीए यु. एस. कदम ट्रॉफी २०२४’ चे ‘चार्टर्ड सुपर किंग्स’ ठरले विजेते

0
29

 

नगर – सीए शाखा अहमदनगर व सीए विद्यार्थी शाखा यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या सीए यु. एस. कदम क्रिकेट ट ्रॉफी – २०२४ मध्ये सीए प्रसाद पुराणिक, ऋषिकेश धर्माधिकारी आणि सुजय पानसरे यांचा संघ म्हणजेच चार्टर्ड सुपर किं१/२स ने यंदा प्रथमच विजेतेपद पटकावले. नगर लब येथील मैदानावर झालेल्या स्पर्धेत एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीने खेळलेल्या सामन्यात सीएसके ने संदीप देसरडा व प्रसाद भंडारी यांचा संघ म्हणजेच डीबीपीए चा १० गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना डीबीपीए ने आपल्या निर्धारित ११ षटकात ६५ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रेम शहा, धीरज वाघ, अमोल कासोळे व जतिन विज्जन यांच्या फलंदाजीच्या जोरावर एकतर्फी १० गडी राखून सहज विजय मिळवला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सीए उत्तमराव कदम व चोपडा मोटर्सचे राजेंद्र चोपडा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिवम टीव्हीएसचे स्वप्नील होले, अपेस हॉस्पिटलचे डॉ. ईश्वर कणसे, डॉ. संतोष गांगर्डे, अलायन्स बिल्डकॉनचे शिवाजी चव्हाण, एम.एम. गंधे अँड कं.चे महेंद्र गंधे, एलआयसी हाउसिंग फायनान्सचे अक्षय सरोदे, इम्पल्स हॉस्पिटलचे डॉ. संदीप गाडे, कृष्णा कन्स्ट ्रशनसचे शिवाजी डोके इ. उपस्थित होते.

या स्पर्धेचे हे ७ वे वर्ष होते. यावर्षी एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता. ३ दिवस नगर लब येथील मैदानावर दिवस रात्र प्रकाशझोतात सामने पार पडले. विजेते व उपविजेत्यांना रोख पारितोषिक व सीए यु. एस. कदम फिरता चषक देण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रेम शहा, उत्कृष्ट गोलंदाज शुभम मुथियान, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जतिन विज्जन तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून धीरज वाघ यांची निवड करण्यात आली. नगर सीए शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांनी सर्व प्रायोजकांचे आभार मानले. उपाध्यक्ष सनित मुथा, खजिनदार अभय कटारिया सदस्य महेश तिवारी पवन दरक यांनी सूत्रसंचालन केले. माजी अध्यक्ष मोहन बरमेचा, मिलिंद जांगडा यांनी स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प्रयत्न केले. या स्पर्धेत पंच म्हणून चैतन्य खोब्रागडे, तेजस रासकर व सोहेल पठाण यांनी काम पाहिले. यावेळी संपूर्ण स्पर्धेचे युट्यूबद्वारे लाइव प्रक्षेपण व क्रिकइन्फ्रो द्वारे केले गेले.