डायल ११२ ला कॉल करून दिली माहिती; पोलिसांनी कॉल करणाऱ्यास पकडले
नगर – मी दोन दिवसांनी अयोध्येला जाणार आहे. तेथे मला कोणी अडवले तर माझ्याकडे असलेल्या २ बंदुकांमधून गोळीबार करील, असा खोटा कॉल डायल ११२ वर करणार्या तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. त्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी (दि.१७) पहाटे २.१८ च्या सुमारास योगेश परदेशी नावाच्या व्येीने डायल ११२ वर त्याचे मोबाईल ९०४९२३७३६९ वरुन फोन करुन कळवले की, माझेकडे २ बंदुका आहेत. मी परवा दिवशी अयोध्येत राम मंदीर कार्यक्रमासाठी जात आहे. तिथे जाऊन बंदुकीने गोळ्या चालवणार आहे.
असा कॉल आल्याने व सदरची घटना गंभीर असल्याने संगमनेर शहर पोलीस स्टेशन चे ड्युटीवरील अंमलदार पो.कॉ. पवार यांनी स्टाफ सह कॉल करणार्या व्येीच्या पत्त्यावर जावुन खात्री केली असता तो दारुचे नशेत घरी मिळुन आला. त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने पोलीसांना त्रास व्हावा या उद्देशातून कॉल केल्याचे सांगितले. त्याचेजवळ बंदुक वगैरे काही एक मिळुन आले नाही. त्याने दारुच्या नशेत पोलीस प्रशासनाची दिशाभूल करुन शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेचा गैरवापर केला म्हणून योगेश परदेशी (वय ४५, रा. जनता नगर, संगमनेर) याचे विरुद्ध भा.दं.वि. कलम १८२, १८८, १७७, मुंबई दारुबंदी कायदा कलम ८५ (१) प्रमाणे संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.