डीजे – डॉल्बी सिस्टीम, लेझर लाईटच्या वापरावर नगर जिल्ह्यात निर्बंध आणावेत

0
130

हरिभूमी प्रतिष्ठानची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर – जिल्ह्यात विविध समारंभ, मिरवणुकांच्या दरम्यान डीजे – डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी तर होतेच शिवाय जेष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया, लहान मुले यांचे आरो१/२य या असह्य ध्वनीमुळे धोयात आलेले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात घातक अशा डीजे – डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटच्या वापरावर निबरध आणावेत अशी मागणी हरिभूमी प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, डीजे – डॉल्बी सिस्टीमच्या कर्कश व असह्य आवाजामुळे जीवितहानी झाल्याच्या घटना अहमदनगर जिल्ह्यात घडत आहेत.

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काही उपाययोजना हरिभूमी प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे सुचविल्या आहेत. यामध्ये – वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून त्याचा डीजे डॉल्बी सिस्टीमसाठी वापर करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना परिवहन विभागाला देण्यात याव्यात. गावात डीजे डॉल्बी सिस्टीम, लेझर लाईट वापर बंदीचा ठराव करणार्‍या ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात यावे. पारंपारिक वाद्य कलाकारांसाठी विशेष प्रोत्साहन योजना तयार करण्यात यावी. ध्वनी प्रदूषण कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी हरिभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय ललवाणी, उल्हास नांगरे, नितीश देशपांडे आदी उपस्थित होते.