अय्यप्पा मंदिरात मकर वीलक्कु उत्सवाची सांगता

0
74

नगर – सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात ६० दिवसांच्या मंडल,मकर पूजा उत्सवाची सांगता मकर वील क्कु उत्सवाने झाली असून या निम्मिताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,तर दोन महिने रोज पूजा, महाप्रसाद झाला अशी माहिती ट ्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष के. के. शेट्टी यांनी दिली भाविकाची श्रद्धा असलेले अय्यप्पाचे मंदिर केरळ मधील शबरीमळा येथे असून त्या मुख्य उत्सवाचा धर्तीवर नगरमध्ये हा उत्सव साजरा केला जातो उत्सावा निम्मित पहाटे महागणपती हवन करण्यात येऊन संध्या श्रमिकनगर मधील बालाजी मंदिर ते अय्यप्पा मंदिर अशी सावेडीतून भव्य शोभायात्रा (तालापोल्ली) काढण्यात आली होती.

महिला मोती कलरच्या साड्या परिधान करून हातात फुलांनी सजवलेली छोटे ताट व त्यामध्ये अर्धा नारळात दिवा असतो ही तालापोल्ली पाहण्यासाठी नागरिकानी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.तर मंदीर परिसर फुलांनी व दिव्यांनी सजविण्यात आले होते.संध्या ७ वा दीपआराधना करण्यात येऊन देवाची आरती व पुष्पभिषेक करण्यात आला.यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती,नंतर भाविकांना महाप्रसाद (गोड जेवण) देण्यात आले व ६० दिवसाच्या उत्सवाची सांगता झाली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अय्यप्पा सेवा सेमितीच्या विश्वस्त व सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.