सायकल व घोडसवारीने विद्यार्थ्यांनी पूर्ण केला चाँदबीबी महालापर्यंतचा ३६ कि.मी.चा प्रवास

0
117

नगर – सद्य परिस्थितीत सायकलचे महत्त्व प्रत्येकास ज्ञात झाले असून, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सायकलची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. सायकल चालवण्याचे अनेक लाभ आहेत. सवारत मोठा लाभ म्हणजे सायकल चालविल्याने आजारापासून दूर राहण्यास मदत होते. नालंदा स्कूलने नेहमीच ‘जुनं ते सोनं’ हा उेी साकार करण्याचा प्रयत्न केला. स्कूलमध्ये विद्याथ्यारना मोफत घोडसवारी शिकवली जाते. नालंदा स्कूलमधील ६वी ते ९वीच्या विद्याथ्यारची एक छोटी सायकल सहल स्कूल ते चांदबीबी महाल काढण्यात आली. सहलीमुळे विद्याथ्यारमध्ये एक वेगळाच उत्साह होता. मुले गंजलेल्या सायकलचा गंज साफ करून या उपक्रमात उत्साहाने सहभाग झाली.

सारोळा बद्दी ते चांदबीबी महल ते शाळेपयरत काही मुलांनी सायकल चालवत, तर काहींनी घोडसवारी करीत सहलीचा आनंद घेतला. यामुळे मुलांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होऊन निसर्गप्रेम, ऐतिहासिक माहिती, तसेच बौद्धिक तथा शारीरिक विकास होण्यास मदत होते. विद्याथ्यारचा सवारगीण विकास स्कूलद्वारे केला जातो, असे कर्नल बहादुर्गेे यांनी सांगितले. मुलांनी नालंदा स्कूल ते चांदबीबी महाल असा ३६ किलोमीटरचा प्रवास सायकल व घोडसवारीने केला. सकाळचा स्वच्छ सूर्यप्रकाश आणि घोडसवारीबरोबर सायकल सफर याचा वेगळा आनंद विद्याथ्यारनी यावेळी घेतला. यादरम्यान वैद्यकीय उपचाराची व्यवस्था होती. घोडसवारीचे कोच म्हणून गौतम बहादुर्गे, तर सायकल सवारीचे कोच म्हणून पल्लवी बहादुर्गे व शादाब मोमीन सहभागी झाले होते.