मराठी उद्योजकांसाठी सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट नगर शाखेचा शुभारंभ

0
40

चेअरमनपदी अजीत पवार, सेकेटरीपदी धिरज सारडा, खजीनदारपदी सचिन शिरसाठ

नगर – महाराष्ट्रीयन मराठी उद्योजकांसाठी ‘एकमेका सहाय्य करु, अवघे होवू श्रीमंत’ हे ब्रीदवाय असलेल्या सॅटरडे लब ग्लोबल ट्रस्ट संघटनेच्या नगर शाखेचा सुभारंभ नुकताच झाला असून, नगर शाखेच्या चेअरमनपदी अवधूत मोबाईल शॉपीचे संचालक अजीत पवार, सेकेटरीपदी धिरज सारडा, खजीनदारपदी सचिन शिरसाठ यांची नियुेी करण्यात आली आहे. ही संघटना संपूर्ण भारतभर कार्यरत आहे. आता नगरच्या व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसाठी संघटनेच्या माध्यमातून मदत होणार आहे आणि मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ नुकताच लबचे चेअरमन अशोक दुगाडे यांच्या हस्ते व सेक्रेटरी विनीत बनसोडे, सहसेक्रेटरी सुहास फडणीस, उद्योजक जयद्रथ खाकाळ यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला आहे. नगरमधील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांनी (उद्योजकांनी) या संघटनेचे सभासद होवून आपल्या व्यवसाय वृध्दीसाठी एकत्र यावे, असे आवाहन संघटनेचे नाशिक नगर रिजनचे रिजन हेड अमोल कासार, डेप्युटी रिजन हेड सागर हासे, अश्विनी कुलकर्णी तसेच संगमनेर शाखेचे चेअरपर्सन डॉ.सागर गोपाळे, सेक्रेटरी अण्णासाहेब थोरात, विनायक ससे यांनी केले आहे. सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट ही चळवळ ब्रिज इंजिनिअर स्व. माधवराव भिडे यांनी २००० साली सुरु केली.

महाराष्ट्रीयन मराठी माणसाने उद्योग व्यवसायातून लक्ष्मीची उपासना करावी, एकमेकांना मदत करून व्यवसाय वृद्धी करावी, अशी या संघटनेची संकल्पना आहे. अधिकाधिक मूल्याधारित प्रगतीसाठी आपण आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे. ’एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ या घोषवायातून संघटनेची कल्पना प्रतीत होते. यामध्ये उत्पादक, तंत्रज्ञ, सल्लागार, व्यावसायिक व विविध सेवा पुरवणारे यांचा समावेश आहे. संघटनेने आपला विस्तार आता फे महाराष्ट्रीतच नव्हे तर गुजरात व मध्य प्रदेशपयरत केला आहे. मेम्बरशीप डेव्हलपमेंट, लिडरशिप डेव्हलपमेंट, मेन्टॉरिंग यासारख्या प्रशिक्षणातून व्यवसाय विस्तारासाठी प्रोत्साहन दिले जाते.

नगरमध्ये ९७ व्या शाखेचा (चॅप्टरचा) शुभारंभ करून संघटना शतक पूर्तीकडे वाटचाल करीत आहे. यामध्ये आजपयरत ५२०० पेक्षा अधिक सदस्यांच्या सहकार्याने १५ हजार कोटीपेक्षा अधिक व्यावसायिक उलाढाल केली आहे. असे नाशिक नगर रिजनचे रिजन हेड अमोल कासार यांनी सांगितले. आतापयरत अजित पवार, नंदेश शिंदे, डॉ.गोवर्धन पांडुळे, सचिन शिरसाठ, धीरज सारडा, डॉ. सोमनाथ भास्कर, उदय भणगे, प्रसाद तोडमल, दिपक कारंडे, गोविंद काळे यांच्यासह ५० उद्योजक, व्यावसायिक या प्रवाहात सामील झाले आहेत. मूळचे नगरकर परंतु सध्या मुंबई पुण्यात स्थायिक अनेक व्यावसायिक या संस्थेत कार्यरत आहेत. आता नगरकरांनी या संधीचा उपयोग करून आपली व्यवसायवृद्धी करण्याची वेळ आहे, असे मत रिजन हेड अमोल कासार सर यांनी केले आहे.