सरसकट जुनी पेन्शन लागू करा

0
24

नगर – गेल्या अनेक दिवसांपासून पेन्शनचा लढा तीव्र होत असतानांही कर्मचार्‍यांमध्ये मतभेद करून २००५ पूर्वी व २००५ नंतरचे गटतट करून शासन जुनी पेन्शनपासून पळ काढत आहे. ५ वर्षे आमदार असणार्‍यांना जुनी पेन्शन दिली जाते परंतु ६० वर्षे एकनिष्ठपणे ज्ञानदानाचे पवित्र काम करणार्‍या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इतर शासकीय कर्मचार्‍यांना मात्र पेन्शन दिली जात नाही हा मोठा अन्याय आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडामंत्री दीपक केसरकर यांना मुंबई येथे मंत्रालयात निवेदन दिले. या २००५ पूर्वी कर्मचार्‍यांना सरसकट पेंशन लागू करू अशी अधिवेशनात घोषणा करूनही अर्धवेळ, तासिका तत्त्वावरील शिक्षकांची भरती असताना त्यांना वगळण्याचा डाव चालू आहे तो होऊ नये म्हणून शिक्षक भारती अहमदनगरच्या वतीने निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती विनाअनुदानित विरोधी धोरण समितीचे राज्याध्यक्ष जयवंत भाबड, नंदुरबार जिल्हाध्यक्ष राहुल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षण मंत्र्यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही त्यामुळे आगामी काळात शिक्षक भारती मोठे आंदोलन उभारणार आहे.

या मागणीसाठी आमदार कपिल पाटील, राज्यअध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, कार्यवाह जालिंदर सरोदे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष आर.बी.पाटील, राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष रामराव काळे, कार्याध्यक्ष डॉ. किशोर डोंगरे, सचिव महेश पाडेकर, उपाध्यक्ष सचिन जासूद, दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाल दराडे, महिला अध्यक्ष रूपाली कुरुमकर, अमोल चंदनशिवे, संजय भालेराव, रूपाली बोरुडे, श्याम जगताप, माफीज इनामदार, मनोहर राठोड, मारुती कुसमुडे, योगेश देशमुख, कल्पना चौधरी, उषा मिसाळ, सुमंत शिंदे, योगेश पाटील, चंद्रशेखर हासे, संपत वाळके, बाबासाहेब चौधरी, गणपत धुमाळ, सुशांत सातपुते, संजय तमनर, चंद्रशेखर हासे, प्रवीण मते, संतोष निमसे, प्रवीण आहेर, सोमनाथ खाडे, जालिंदर पटारे, बाबाजी लाळगे, मीनाक्षी हपसे, बबन भोसले, नानासाहेब खराडे, हरिश्चंद्र पंडित, नितीन शिरसाट आदी पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला.