नगर परिसरातून २ दिवसांत तीन अल्पवयीन मुली बेपत्ता

0
49

नगर – दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्येीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना शनिवार (दि.१३) व रविवारी (दि.१४ घडल्या आहेत. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलींच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार शहरात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीला (वय १५) रविवारी दुपारी १२ वाजता तिच्या राहत्या घरातून अज्ञात व्येीने पळवून नेले. सदरचा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. त्यानंतर आईने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करीत आहेत. नगर तालुयातील विळद गावातील अल्पवयीन मुलीला (वय १२) अज्ञात व्येीने शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पळवून नेले.

मुलीच्या नातेवाईकांना सदरची घटना समजल्यानंतर त्यांनी मुलीचा परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मुलीच्या वडिलांनी रविवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ करीत आहेत. अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तिसरी घटना नगर तालुयातील देहरे गावात घडली. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीला (वय १३) अज्ञात व्येीने पळवून नेले. सदरचा प्रकार मुलीच्या नातेवाईकांच्या लक्ष्यात येताच त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. परंतु ती मिळून आली नाही. याप्रकरणी मुलीच्या आईने रविवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्येी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हंडाळ करीत आहेत.