श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फटाक्यांची विक्रीसाठी परवानगी मिळावी

0
64

असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना निवेदन

नगर – अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी फटाका विक्री करण्यास परवानगी मिळावी म्हणून दि अहमदनगर फटाका व्यापारी असो चे वतीने निवासी जिल्हाधिकारी नरेंद्र पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले. या वेळी असो. चे अध्यक्ष सुरेश जाधव, सचिव श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष गजेंद्र राशीनकर, गणेश परभणे, सहसचिव अरविंद साठे, देविदास ढवळे, उमेश क्षीरसागर, उबेद शेख, अमोल तोडकर आदी उपस्थित होते.

२२ जानेवारी ला संपूर्ण भारतात व भारताबाहेर अयोध्या येथील श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होणार आहे. सदर सोहळा दिवाळी सारखा साजरा करावा असे आवाहन करण्यात आहे त्या निमित्त अहमदनगर शहर व जिल्ह्यामध्येही नागरिकांना हा सोहळा साजरा करता यावा या हेतूने दि अहमदनगर फटाका व्यापारी असो चे वतीने निवासी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फटाका विक्री करणेसाठी परवानगी मागितली असता दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांनी परवानगी देण्यास हरकत नाही असे सांगितले व लवकरच परवानगी देऊ असे आश्वासन दिले.

या वेळी असोचे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी अहमदनगर जिल्ह्यातील फटाका व्यापार्‍यांनी आपआपल्या तालुयात गावात परवानगी घेऊन फटाका विक्री करून या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. तर असो चे सचिव श्रीनिवास बोज्जा यांनी हा सोहळा सर्व नागरिकांनी दिवाळी सारखा फटाके उडवून साजरा करावा असे आवाहन केले. या वेळी असोचे उपाध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांनी सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या व प्रशासनाचे आभार मानले.