पालकत्व आणि शिक्षकत्व या संयुक्त जबाबदाऱ्या सेवेच्या आहेत : प्रसाद काथे

0
151

संपदा विद्या प्रतिष्ठानचे ज्ञानसंपदा स्कूल आयोजित ज्ञानसंपदा व्याख्यानमालेप्रसंगी पत्रकार प्रसाद काथे यांचा सत्कार करताना संपदा विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व शालेय समितीचे चेअरमन कारभारी भिंगारे.समवेत
मानद सचिव अरूण कुलकर्णी आदी

पालकत्व आणि शिक्षकत्व या संयुक्त जबाबदार्‍या आहेत. या दोन्ही जबाबदार्‍या सेवेच्या आहेत. एकदा पालकाची भूमिका आपण स्विकारलीत तर ती तहहयात बजावावी लागेल शिक्षकाच्या भूमिकेचे ही तसेच आहे म्हणून या भूमिका घेण्यापूर्वीच आपल्या जबाबदारीची जाणीव असायला हवी एकदा ही भूमिका स्वीकारलीत की मग मात्र त्यातून कधीही सुटका नाही असे प्रतिपादन पत्रकार प्रसाद काथे यांनी केले. संपदा विद्या प्रतिष्ठानचे ज्ञानसंपदा स्कूल आयोजित ज्ञानसंपदा व्याख्यानमालेत प्रसाद काथे यांनी शिक्षणाचे महत्त्व रुजवताना शिक्षक व पालकांचे योगदान या विषयावर ज्ञानसंपदा व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्प गुंफले. यावेळी संपदा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण बजाज, उपाध्यक्ष व शालेय समितीचे चेअरमन कारभारी भिंगारे, मानद सचिव अरूण कुलकर्णी, खजिनदार अविनाश बोपर्डीकर, मुख्याध्यापिका शिवाजंली अकोलकर आदी उपस्थित होते. या व्याख्यानमालेचे हे १३ वर्ष आहे. ते पुढे म्हणाले, तुम्ही एकदा पालक, शिक्षक व विद्यार्थी झालात की कायमस्वरूपी तुम्ही त्याच भूमिकेत असता, तुमची जबाबदारी निश्चित होते तुम्ही ती झटकून टाकू शकत नाही. पाल्याला शाळेत टाकले की पालकांची जबाबदारी संपत नाही तर ती वाढते. या विद्यार्थ्यांची ग्रहण शक्ती कशी वाढेल यासाठी विविध प्रयोग करा, आपण जे ग्रहण करतो त्याबद्दल प्रतिसाद द्यायला शिकवा, विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य कसे सुदृढ असेल याचाही विचार करा. आपला मुलगा हा नऊ ते सहा असा राबणारा कामगार बनवण्यापेक्षा सुजाण, शिस्तबद्ध नागरिक कसा होईल याकडे लक्ष द्या. विद्यार्थी सरासरी आठ तास शिक्षकांच्या सहवासात असतो त्याच्यामध्ये असा कोणता अमुलाग्र बदल घडवून आणू शकतो याकडे शिक्षकांचे लक्ष असायला हवे. कारण विद्यार्थी जेवढे शिक्षकांचे ऐकतो तेवढे कोणाचेच ऐकत नाही अर्थात तुमच्या शिकवण्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. तुमचे पाल्य/ विद्यार्थी केवळ पाल्य/विद्यार्थी नाहीत तर ते सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. ते सतत आजूबाजूला घडणार्‍या घटना टिपत असतात त्यातून आपलीही सुटका होत नाही याचे भान ठेवा. ठराविक वयानंतर मुलं आपोआप आई- वडिलांपासून वेगळे होतात. शिस्त अवाजवी अपेक्षा यामुळे ती दुरवतात नात्यातला हा दुरावा संवाद संपवतो. यामुळे पालकांना एकटेपण फार लवकर येते. यासाठी स्पर्श थेरपी प्रभावी ठरते. असे होणार नाही यासाठी कधीतरी त्याला जवळ घ्या, त्याच्या केसातून हात फिरवा, त्याचा गालगुच्चा घ्या! प्रथमत शालेय विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली. सुत्रसंचालन मुक्ता दिवेकर यांनी केले. प्रास्ताविक कैलास जाधव यांनी केले. पाहुण्याचा परीचय भाग्यश्री जाधव यांनी करून दिला. आभार प्रसाद बर्वे यांनी मानले. भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, लोकसभा निवडणूक प्रमुख बाबासाहेब वाकळे उपस्थित होत