वकिलाची २ लाखांची फसवणूक; फोन पे द्वारे पैसे घेतले परस्पर काढून

0
15

नगर – वकिलाच्या मोबाईलचा वापर त्यांच्या मावस भावाने करून २ लाख १ हजार रूपये फोन पे व्दारे काढून घेत फसवणूक केली. सदरचा प्रकार २९ डिसेंबर २०२३ ते ३ जानेवारी २०२४ च्या दरम्यान मुकुंदनगर परिसरात व जिल्हा न्यायालयासमोर घडला आहे. याप्रकरणी मुकुंदनगर परिसरात राहणार्‍या वकिलाने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमान सादीक शेख (रा. अल अमील ग्राऊंडजवळ, मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्येीचे नाव आहे. फिर्यादी व अमान हे दोघे मावस भाऊ आहेत.

अमान याने २९ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलचा वापर करून त्यांच्या फोन पे नंबर वरून त्याच्या फोन पे नंबरवर अन्यायाने व विश्वासघात करून एकुण दोन लाख एक हजार रूपयांची र क्कम पाठवली. सदरचा प्रकार फिर्यादीच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमान शेख विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार डी.व्ही झरेकर करीत आहेत.