न्यायालयाच्या आवारात तक्रारदाराला धमकी

0
14

नगर – धनादेश न वटल्याने कलम १३८ अन्वये जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल करणार्‍या तक्रारदाराला आरोपीने जिल्हा न्यायालयाच्या आवारातच धमकी दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जमिर शेख उर्फ शिवराम आर्य यांनी आरोपी मधुकर मोहिते यांच्या विरूद फिर्याद दिली आहे.

केलेल्या तक्रारीच्या काम काजा संदर्भात फिर्यादी बुधवारी (दि.१०) जिल्हा न्यायालय येथे गेले असता आरोपी मोहिते यांने त्यांना माझ्या विरूद्ध क्रॉस ऑर्डर कशी काय घेतली, तुझ्याकडे बघून घेतो, पुढील तारखेला न्यायालयात जायचं नाही. अशी धमकी दिली. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.