मागासवर्गीय महामंडळातील कर्जदारांचे कर्ज माफ करावे

0
22

भाजप अनुसुचित मोर्चाचे नरेश चव्हाण यांचे पालकमंत्री विखे यांना निवेदन

नगर – मागासवर्गीय विकास महामंडळातील व बँकेचे कर्जदारांचे कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीचे निवेदन भाजप अनुसुचित जाती मोर्चाच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष नरेश चव्हाण यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना दिले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, संदिप पवार उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट ्र राज्यात गेल्या १५ वषारपासून अनेक कारणाने तमाम मागासवर्गीय समाजाचे दुष्काळ, अतिवृष्टी, आर्थिक मंदी, कोविड महामारी अशा अनेक कारणाने मागासवर्गीय समाजाचे अनेकवेळा अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे मागासवर्गीय महामंडळ, बँका यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शय होत नाही.

याबाबत मागील सरकार दरबारी सांगून कुठलीही मदत देण्यात आली नाही. तरी आपल्या माध्यमातून सरकार दरबारी मागणी आहे की, मागासवर्गीय कर्जदारांचे कर्ज व सर्व मागासवर्गीय विकास महामंडळातील व बँकेतील कर्ज माफ करण्यात यावे. ज्या आर्थी मागासवर्गीय समाजाला गेल्या १५ वषारपासून न मिळालेला न्याय मिळेल व मागासवर्गीय समाज विकासाच्या प्रवाहात येण्यास मदत होईल. सदर निवेदनाची दखल घेऊन आपले सरकार यो१/२य निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे, असे निवेदनात म्हटले आहे.