निंबळक – केंद्र शासनाने घेतलेल्या स्व हस्त लिखित वीरगाथा ह्या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर जिल्हा परिषद निंबळक शाळेची ई.तिसरीची विद्यार्थिनी कु.गौरी उगले हिची निवड झाली त्याबद्दल तिचा व पालकांचा सन्मान पं.स. माजी उपसभापती डॉ.दिलीप पवार यांनी केला. तिने आपल्या निंबळक शाळेच्या व गावाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असुन संपूर्ण नगर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. केंद्र सरकारचा शालेय विद्याथ्यारसाठी असणारा देश पातळीवरील ’स्व’ हस्तलिखित वीरगाथा उपक्रमांतर्गत भारत देशातून १०० विद्याथ्यारची निवड झाली आहे.
यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सहा विद्याथ्यारची निवड झाली असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून एकमेव निवड झालेली विद्यार्थिनी कु.गौरी किरण उगले, इयत्ता- तिसरी निंबळक, ता नगर या शाळेतील असून तिचा व तिच्या पालकांचा २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे सन्मानपूर्वक भारताच्या महामहीम राष्ट ्रपती मान. द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. शालेय स्तरावर उपक्रमशील वर्गशिक्षिका अर्चना जाचक यांचे गौरीला अनमोल मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
गौरी, मार्गदर्शक शिक्षिका, आई, वडील, निंबळक शाळेतील सर्व शिक्षक या सवारचे मन…पूर्वक हार्दिक अभिनंदन. यावेळी निलेश पाडळे, बी.डी.कोतकर, दत्तात्रय दिवटे, शिवाजी दिवटे, अतुल कुलट, सोमनाथ खांदवे, प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र निमसे, दत्ता जाधव, सुखदेव पालवे, रघुनाथ झावरे, अलका कांडेकर, सौ.हापसे, सुनिता रणदिवे, शैला सरोदे, प्रयागा मोहोळकर, मुेा कोकणे, सुजाता किंबहुने, भागचंद सातपुते, शरद जाधव, विशाल कुलट शिक्षक उपस्थित होते.