प्रसाद तारे यांचे आवाहन; संपदा विद्या प्रतिष्ठानचे ज्ञानसंपदा स्कूल आयोजित ज्ञानसंपदा व्याख्यानमालेस सुरूवात
नगर – ध्येय निश्चिती आणि त्याच्या पूर्ततेसाठी विजिगिषू वृत्ती, परिस्थितीवर प्रभुत्व, अखंड काळाचे भान, सतत वर्तमान काळात जगणे असे असंख्य पैलू शिवछत्रपतींच्या व्यिेमत्त्वात आढळतात या पैलूंचा, नैपुण्याचा विद्याथ्यारनी अंगीकार करावा, असे आवाहन इतिहास संशोधक व अभ्यासक प्रसाद तारे यांनी केले संपदा विद्या प्रतिष्ठानचे ज्ञानसंपदा स्कूल आयोजित ज्ञानसंपदा व्याख्यानमालेत इतिहास संशोधक व अभ्यासक प्रसाद तारे यांनी ’शिवछत्रपतींचे अपरिचित व्यिेमत्व पैलू’ या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेची सुरूवात झाली. यावेळी संपदा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण बजाज, उपाध्यक्ष व शालेय समितीचे चेअरमन कारभारी भिंगारे, मानद सचिव अरूण कुलकर्णी, खजिनदार अविनाश बोपर्डीकर, मिलिंद गंधे, विनोद बजाज, श्रीहरी टिपुगडे, मुख्याध्यापिका शिवाजंली अकोलकर आदी उपस्थित होते. ‘शिवछत्रपतींच्या व्यिेमत्वाचे अपरिचित पैलू’ या विषयावर श्री. तारे बोलत होते. या व्याख्यानमालेचे हे १३ वर्ष आहे. श्री. तारे पुढे म्हणाले, वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर इयत्ता अकरावीतील या तरुणाचे ध्येय निश्चित होते. सिंधू नदीच्या उगमापासून गंगा नदीच्या पैलतीरापयरतचा प्रदेश परकीय आक्रमणापासून मुे करावा असे उत्तुंग ध्येय शिवछत्रपतींनी आपल्या मनी योजले होते.
विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनात आपल्या ध्येयापेक्षा जास्त कर्तुत्व गाजवले. एकीकडे आदिलशहा, कुतुबशहा, इंग्रज, सिद्धी आणि पोर्तुगीज अशा एकापेक्षा एक बलाढ्य शत्रूंना नमवून छत्रपतींनी या नैपुण्याच्या जोरावरच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांची ३३ चित्रे उपलब्ध आहेत. या बहुतेक चित्रात व तत्कालीन इतिहासकारांच्या नोंदीत महाराजांच्या चेहर्यावर स्मित हास्य असे असे नोंदवले आहे. उत्तुंग कर्तृत्व असूनही त्यातील ताणाचा लवलेशही त्यांनी आपल्या व्यिेमत्त्वावर उमटू दिलेला नाही. कायम वर्तमान काळात जगण्याचा त्यांचा गुण या कामी आला. शाहिस्तेखानाची बोट छाटण्याचा प्रसंग सांगून त्यांनी त्यांचे हे पैलूं विस्ताराने सांगितले.
विद्यार्थीदशेत ध्येय निश्चिती, काळाचे भान, प्रसंगी प्राण देणारी माणसे जोडण्याची कला अशा शिवछत्रपतींच्या गुणांसह आजच्या काळानुरूप संगणक कौशल्य, इंग्रजी संभाषण कला, आपला मुद्दा पटवून देणे इत्यादी गुण विद्याथ्यारनी अंगीकारलेच पाहिजेत असे म्हणाले. शिवरायांच्या कार्याची महती सांगणार्या पोवाड्याचे गायन विदयार्थ्यानी सादर केले. सुत्रसंचालन श्रीमती स्वाती तवले यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका शिवाजंली अकोलकर यांनी केले. परीचय शिल्पा कुलकर्णी यांनी करून दिला. आभार मुेा दिवेकर यांनी मानले. रविंद्र मुळे, भुषण देशमुख, अनंत देसाई, राजेंद्र काळे उपस्थित होते.