चिंता करणाऱ्या मनाला चिंतनाकडे वळवण्याकरिता शुद्ध मनाची गरज असते

0
32

मोहनबुवा रामदासी यांचे प्रतिपादन; स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी ट्रस्ट आयोजित व्याख्यानमाला दुसरे पुष्प

भिंगार – मनाला चिंतनाची व संस्काराची खरी गरज आहे. म्हणून मनाच्या शुद्धतेच्या आड येऊन मनाला अस्वस्थ करणार्‍या विषयाचा प्रत्येकाने शोध घ्यायला हवा. त्याकरिता स्वत:चे कर्म चांगले असायला हवे. म्हणून मनातील वैश्विक विचारांना पुढे घेऊन जाणारे विचार प्रत्येकाने आत्मसात करायला हवेत.म्हणूनच चिंता करणार्‍या मनाला चिंतनाकडे वळवण्याकरिता शुद्ध मनाची गरज असते असे प्रतिपादन व्याख्याते मोहनबुवा रामदासी यांनी स्वामी विवेकानंद जनकल्याण ट ्रस्ट आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना केले. ते पुढे म्हणाले, ईश्वरापयरत जाण्याकरिता शुद्ध मनही तुझी ओळख आहे. हे प्रत्येकाने ओळखायला हवे. म्हणून चिंता नाही तर प्रत्येकाने चिंतन करायला हवे. कारण देह हा आनंदाकरिता दिलेला आहे.

चैतन्यातील, कणाकणातील सामर्थ्य शिे प्रेरणा माझ्यात यायला हवी. त्या शिेचा मनाला आनंद घेता यायला हवा. अवतीभोवती असणारी माणसे ईश्वराने दिलेली आहेत. आपण त्यांच्याशी कसे वागतो हे इतरांशी आपण कसे वागतो यावरून ठरत असते. मनुष्याच्या ठायी असलेले मन पापाचा व पुण्याचाही संचय करत असते.तसेच मनाला एकांताची सवय नसते. म्हणून संकल्प वाढवावेत, मनाची शिे वाढवावी, मनाला एकांताबरोबरच, मनाच्या वेलीवरील फुले टवटवीत राहण्याकरिता मनाला चिंतनाची सवय लावावी, मनावर चांगले संस्कार व्हायला हवेत.

श्वास भगवंतानी दिलेला आहे. प्रपंचातील स्वर भगवंतानी निर्माण केलाय म्हणून चिंतनाकडे वळा, मनातील विषयांचा संकल्प ठेवा, श्वास नियंत्रित करा, विषयात गुंतलेले मन त्या विषयाच्या ओझ्याने दबायला नको. ऐहिक वासना जवळ ठेवली तर परमेश्वराच्या चिंतनात मन कसे रमेल? म्हणून मनाला चिंतनाला लावणारा विक्षेप शोधायला हवा, शिष्याच्या अंत:करणातील तळमळ ओळखणारे सदगुरू असणे, ही भिेची परिसिमा असते. म्हणून मनाला नित्य चिंतनाची गरज आहे. हवा लागते पाणी लागते मग चिंंतनाची आवश्यकता का असू नये, ऐकलेल साठवून ठेवण्याकरिता मनाची क्षमता, ताकद वाढयला हवी. मनाद्वारे गुरूकडे जाण्याकरिता मनावर तसे संस्कार करायला हवेत.असे व्याख्यानाच्या शेवटी ते म्हणाले. व्याख्यानमालेचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मुळे यांनी तर व्याख्याते मोहनबुवा रामदासी यांचा परिचय रितेश फिरोदिया यांनी करून दिला. ओंकार संगीतालयाच्यावतीने स्वागतगीत गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी मंचावर संस्थेचे कार्याध्यक्ष शिवप्रसाद काळे व संस्थेचे उपाध्यक्ष रूपेश भंडारी उपस्थित होते. व्याख्यानाचे सुत्रसंचालन स्नेहल झांबरे यांनी तर आभार रमेश वराडे यांनी व्ये केले.