भारत स्वच्छ अभियानात ‘ड’ वर्ग महापालिकेत नगर मनपाला तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन; नाशिक विभागात प्रथम

0
12

मानांकनाबद्दल अभिनंदन : आ. संग्राम जगताप

नगर – भारत स्वच्छ अभियानाच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने संत गाडगेबाबा यांचे स्वच्छतेचे स्वप्न साकार होताना दिसत आहे अहमदनगर महानगरपालिकेने देखील सन २०२० पासून भारत स्वच्छ अभियानामध्ये भाग घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करीत नगर शहर कचराकुंडी मुे केले आहे. याचबरोबर नागरिकही आपला कचरा घंटागाडी मध्येच टाकत असल्यामुळे आपल्या शहराला स्वच्छतेचे रूप प्राप्त झाले आहे या माध्यमातून नागरिकांचे आरो१/२य ही सुदृढ निरोगी राहण्यास मदत होत असते. अहमदनगर महानगरपालिकेने भारत स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला असून नगर स्वच्छ भारत अभियानांतर्गत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०२३ या स्पर्धेमध्ये राज्यातील ड वर्ग महापालिकेत अहमदनगर मनपाला तिसर्‍या क्रमांकाचे मानांकन तर नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळाला असल्याची माहिती देत आ. संग्राम जगताप यांनी सवारचे आभार मानले.

आ. संग्राम जगताप यांनी पुढे सांगितले की, नागरिकांच्या सहकार्यातून नगर शहराची वाटचाल विकसित शहराकडे सुरू असून शहर स्वच्छतेबाबतची कामगिरी अशीच राहणार आहे, आपण सर्व जण अधिक जोमाने काम करीत देशांमध्ये नावलौकिक मिळवू, या नगर शहरामध्ये स्वच्छतेबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करीत अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम केले असल्यामुळेच तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे आपण आपले शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यास यशस्वी झालो आहे. अहमदनगर महानगरपालिकेला भारत स्वच्छ अभियानामध्ये मिळालेल्या मानांकनासाठी सवारचे सहकार्य लाभले आहे, याबद्दल सवारचे अभिनंदन करतो व नगरवासीयांनी असे स्वच्छतेबाबत आपले काम करावे असे मत आ. संग्राम जगताप यांनी व्ये केले.

कचराकुंडी मुे करण्यासाठी पुढाकार घेत घंटागाडीची संकल्पना प्रत्यक्षात साकारली, यासाठी मनपा अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक यांचे योगदान लाभले, तसेच माजी महापौर रोहिणी शेंडगे, व माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून शहरात मनपाच्या वतीने स्वच्छता अभियान सुरु केले. स्वच्छ भारत अभियानात केंद्र शासनाच्या समितीमार्फत झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात मागील काही वर्षापासून नगर शहराने प्रगती केली आहे. तसेच वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभी करत नगर शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्याची संकल्पना राबवली जात असल्याचे मत आ. जगताप यांनी व्यक्त केले.