ऑनलाइन शिधापत्रिका प्रणाली दुरुस्त करून नागरिकांना लाभ मिळवून द्यावा

0
61

अन्नधान्य वितरण कार्यालयाचा गलथान कारभाराचा निषेध; सुधारणा न झाल्यास आंदोलन

नगर – अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे पात्र कुटुंबांना रेशन धान्य व आयुष्यमान भारत योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. तरी ऑनलाईन शिधापत्रिका प्रणाली व्यवस्थित करून नागरिकांना लाभ मिळवून देण्याची मागणी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, १६ मे २०२३ रोजी सामान्य प्रशासन शासन निर्णय अन्वे ई शिधापत्रिका सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्याकरिता (आरसीएमएस महाफुड) प्रणाली उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरीही अन्नधान्य वितरण कार्यालय येथे सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. तरीही जे नागरिक अंत्योदय योजना (अधध) व प्रधान कुटुंब योजनेचे (झकक) लाभार्थी आहे.

अशा नागरिकांचे पब्लिक लॉगिनवरून ऑनलाईन प्रकरण सादर करण्यास नागरिकांना शासनाने मुभा करून दिलेली आहे. तरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सहाय्यक पुरवठा अधिकारी व विविध अधिकारी दिलेले असून, सदर कार्यालयात वरील अधिकारी ऑनलाइन शिधापत्रिकेची नोंदणी न करता रास्त भाव दुकानदार किंवा सेतू कार्यालय येथे पाठवतात. सद्यस्थितीमध्ये . नागरिकांची पळापळ होत असून, जे नागरिक प्राधान्य कुटुंब योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करतील त्यांना (झकक) योजनेचा लाभ द्यावा व ऑनलाइन प्रणाली व्यवस्थित चालवण्यासाठी योग्य तो पर्याय द्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.