‘संपात’ सहभागी न झालेली वाहने अडवून चालकांना काळे फासत घातले ‘चपलांचे हार’

0
41

‘हिट ॲण्ड रन’ कायद्याविरोधात वाहतूकदार संघटनेचा संप नगरमध्ये चिघळला; १३ जण पोलिसांच्या ताब्यात

नगर – नव्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरातील वाहतूकदार आणि ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपाला नगरमध्ये गुरुवारी (दि.११) गालबोट लागले. या संपात सहभागी न होता रस्त्यावर वाहने घेवून आलेल्या काही वाहनचालकांच्या तोंडाला काळे फासत त्यांना चपलांचा हार घालण्यात आला. या आंदोलकांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत त्यांची धरपकड केली असून १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अलीकडेच संसदेत मंजूर झालेल्या भारतीय न्यायिक संहिता २०२३ या कायद्यानुसार, हिट अँड रन प्रकरणांत संबंधित दोषी चालकाला पकडल्यावर ७ लाख रुपयांपयरत दंड आणि १० वषारपयरतच्या तुरुंगवासाची . तरतूद आहे. याला वाहतूकदारांचा तीव्र विरोध असून या नव्या कायद्यामुळे ट्रक चालक, खासगी बसचालक मोठ्या संख्येने नोकर्‍या सोडत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. हा कायदा रद्द होण्यासाठी देशभर वाहतूकदार आणि ट्रक चालकांचे आंदोलन सुरु आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील वाहतूकदार व ट्रक चालक संघटनाही यामध्ये सहभागी झालेल्या आहेत.

नगर शहरात अहमदनगर ड्रायव्हर युनियनच्या वतीने फलटण पोलीस चौकी, कोठला येथून शहरातील सर्व ड्रायव्हर एकत्र येऊन केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये ट्रक चालक, हेवी व्हेईकल ड्रायव्हर, टॅसी चालक, ऑटो रिक्षा चालक सहभागी झाले होते. आतापर्यंत शांततेत सुरु असलेले हे आंदोलन गुरुवारी सकाळी चिघळले.

काही चालकांना काही वाहने संप झुगारून माल वाहतूक करत असल्याचे दिसून आल्यावर शहरातील कोठला बसस्थानकाजवळ अनेक आंदोलक जमा झाले व त्यांनी ही वाहने अडवून चालकांच्या तोंडाला काळे फासणे, चपलांचा हार घालणे, वाहनांच्या चाकांच्या हवा सोडणे सुरु केले. ही माहिती मि ळताच तोफखाना व कोतवालीचे पोलिस घटनास्थळी गेले. त्यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले मात्र आंदोलक ऐकत नसल्याने पोलिसांना त्यांच्यावर सौम्य लाठीमार करावा लागला. त्यातील १३ आंदोलकांना पोलिसांनी पकडून भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दुपारी उशिरापयरत या आंदोलकांच्या विरुद्ध फिर्याद देण्यासाठी कोणीही वाहनचालक आला नसल्याचे स.पो.नि. दिनकर मुंडे यांनी सांगितले.