प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर होणार कारवाई

0
43

माहिती देणार्‍यास महानगरपालिकेकडून ५००० चे बक्षीस

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईसाठी आयोजित बैठकीत महापालिका प्रशासन

नगर – शासनाने वापरास प्रतिबंध केलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर महानगरपालिका कठोर कारवाई करणार असून अशा विक्रेत्यांची गोपनिय माहिती देणार्‍यास महानगरपालिका प्रशासनाकडून ५०००/- रूपयांचे रोख बक्षीस देणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी या विषयाबाबत आयोजित बैठकीत दिली. बैठकीस अति. आयुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त अजित निकत, सहा. आयुक्त सपना वसावा, स्वच्छता कक्ष प्रमुख परिक्षीत बिडकर, प्रसिद्धी विभाग प्रमुख शशिकांत नजान, हरीयालीचे सुरेश खामकर, हरी भुमीचे अभय ललवाणी यांच्यासह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. नायलॉन मांजामुळे मनुष्य तसेच पक्षांच्या जिवीतास धोका निर्माण होतो त्यामुळे अशा प्रकारच्या नायलॉन मांजावर शासनाने प्रतिबंध घातलेले आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. महानगरपालिकेमध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणार्‍या विक्रेत्यांची माहिती ७५८८१६८६७२ या भ्रमणध्वनीवर माहिती द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. याचबरोबर नागरीकांनी देखील जिवीतास धोका निर्माण करणार्‍या नायलॉन मांजाचा वापर स्वतःहुन टाळावा असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले आहे.