दिव्यांगामध्ये वधू-वर मेळाव्यातून नात्याचा गोडवा निर्माण होईल : धनश्री विखे

0
81

 

नगर – दिव्यांगांसाठी दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी मोठे कार्य केले होते. त्यांनी आपल्या सामाजिक जीवनात अनेक उपक्रम राबविले. हाच वारसा आता खासदार सुजय विखे उत्तमरीत्या चालवत असून ते कायम आम्हाला म्हणत असतात की माझ्या सामाजिक जीवनात दिव्यांगांसाठीचे कार्य करत असल्याचा आनंद वाटतो. या पुढील काळातही दिव्यांगांसाठी कार्य विखे पाटील कुटुंबीय करत राहणार आहे तसेच वसंत शिंदे हे दिव्यांगांचे प्रश्न सातत्याने सोडवत दिव्यांगांसाठी ते वर्षभर राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे, असे धनश्री विखे पाटील यांनी सांगितले. जिल्हा भाजप दिव्यांग विकास आघाडी तसेच जिल्हा अपंग संघटनेच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनश्री विखे पाटील, भाजप युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट ्रवादी शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, दिव्यांग विकास आघाडी जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे, आशा गायकवाड, समाज कल्याण अधिकारी राधाकृष्ण देवढे, प्रहार संघटनेचे लक्ष्मण पोकळे, रत्नाकर ठाणगे, शहर जिल्हाध्यक्ष विजय पडोळे, जिल्हा सचिव संतोष शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत काळे, जिल्हा उपाध्यक्ष, ईश्वर गुंड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल कराळे, जिल्हा सरचिटणीस सुरेश देवकर, जिल्हा सहसचिव कैलास शेलार, महिला जिल्हा सरचिटणीस दिपाली पडोळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष जामगावकर, नगर तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे, नगर तालुका उपाध्यक्ष संदीप शेंडकर, शेवगाव तालुकाध्यक्ष प्रशांत ढाकणे, नेवासा तालुका अध्यक्ष सोनाजी शेळके, तसेच प्रहार क्रांती आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पोकळे, राष्ट ्रवादी कॉग्रेसचे अपंग जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे, आधार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण खडके आदिसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

अक्षय कर्डिले म्हणाले की, राज्यभरातून आपण सर्वजण येथे आलात आजच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव तसेच त्यांचे पालक उपस्थित आहेत याचा आनंद वाटला. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे कायम दिव्यांग यांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत अनेक वेळा भाजप दिव्यांग आघाडीच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना येणार्‍या अडचणी शिवाजीराव कर्डिले यांच्यापयरत पोहोचतात त्याला तत्काळ मदत देखील शिवाजीराव कर्डिले करत आहेत. इतर जिल्ह्यांपेक्षा नगर जिल्ह्यातील दिव्यांग आघाडी अधिक कार्यक्षम व दिव्यांग यांच्या प्रश्नांवर सतत काम करत असल्याने राज्यात नावलौकिक मिळवलेला आहे. वसंत शिंदे यांनी आजपयरत अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून यामध्ये वधूवर परिचय मेळावा असेल किंवा दिव्यांगांसाठीच्या योजना राबवणे. या योजना दिव्यांग बांधवांपयरत पोहोचवण्याचे काम केले आहे. या पुढील काळात देखील दिव्यांग आघाडी तसेच शिवाजीराव कर्डिले, खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून दिव्यांगांची सेवा करीत राहणार आहे. असे ते म्हणाले जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे म्हणाले की, खासदार विखे यांनी दिव्यांगांना पाच हजार रुपये दरमहा पेन्शन मिळावी तसेच नगर जिल्ह्यामध्ये दोन एमआयडीसी मंजूर झाल्या आहेत.

यामध्ये दिव्यांगांसाठी काही जागा आरक्षित करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. आदी मागण्या लोकसभेत मांडाव्यात व दिव्यांगांना न्याय देण्याचे काम करावे. या वधुवर मेळाव्याच्या माध्यमातून आयुष्याचा जोडीदार मिळणार आहे, मात्र त्यांच्या विविध प्रश्नांसाठी खूप झगडावे लागते, शासकीय कार्यालयात त्यांना मानसन्मान मिळत नाही तो मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, शिवाजी कर्डीले यांच्या माध्यमातून दिव्यांग व्येीसाठी वर्षभर काम केले जाते असे ते म्हणाले, यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर व राष्ट ्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी मनोगते व्ये केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र टाक तर आभार आशा गायकवाड यांनी मानले. राज्यस्तरीय दिव्यांग वधु-वर परिचय मेळाव्यामध्ये प्रा.वसंत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. नुकत्याच झालेल्या मेळाव्यामध्ये दिव्यांग वधू कोमल साहेबराव आडागळे आणि दिव्यांग वर तुषार नारायण देवतरशे या दोघांचा परिचय होऊन विवाह निश्चित करण्यात आला. हे दोघे लवकरच विवाह बंधनात बांधली जातील.