अर्थजगत

0
254

करदात्यांच्या वैयक्तिक उत्पादनात वाढ झाल्याने विद्यमान आर्थिक वर्षात १० ऑगस्टपर्यंत देशाचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेत १५.७३ टक्क्यांनी वाढून ६.५३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. करदात्यांना दिला गेलेला परतावा (रिफंड) वजा केल्यास, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन ५.८४ लाख कोटी रुपये नोंदवले गेले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा १७.३३ टक्क्यांनी अधिक राहिले आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शदिली. जागतिक पातळीवर प्रतिकूल वातावरण असतानादेखील आर्थिक क्रियाकलापांमध्ये गतिमानता कायम आहे. आर्थिक वर्षात आजवर प्रत्यक्ष करांचे संकलन अंदाजपत्रकीय उद्दिष्टाच्या ३२.०३ टक्के इतके झाले आहे. केंद्र सरकारने केलेल्या धोरणात्मक उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्थेतील विविध घटकांनी कर संकलनामध्ये वाढीस हातभार लावला आहे.